फातोर्डा: कोकण रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या पदपथावर झाडे जुडपे वाढलेली असून याबरोबरच काही ठिकाणात पेर्व्हर्सही मोडलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे पतपथावरून जाणे पादचाऱ्यांसाठी अडचणीचे बनले आहे. या परिसरात झाडाझुडपांचे जंगल स्वरूप प्राप्त झाले असल्याने ही झुडपे तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
गोव्यातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकावर वाढलेली झाडे झुडपे या स्थानकावर उतरणाऱ्या पर्यटकांच्या नजरेआड राहत नाही. स्थानकावरून मुख्य रस्त्यावर गेल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुला पदपथावर वाढलेली ही झाडे झुडपे दिसत असत. ईएसआय हॉस्पिटलपासून रावणफोंड जंकशनपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणीही झाडे झुडपे वाढलेली आहेत. या बरोबरच काही ठिकाणी परप्रांतीयांनी आपले निवासी ठिकाण येथे बनविलेले आहे. तसेच कोकण रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या कोकण रेल्वेच्या जागेत झुडपांचे जंगल बनले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.