Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Shristhal: श्रीस्थळ येथे जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांच्या तक्रारी दाखल; महिलेचा विनयभंग झाल्याचा दावा

Shristhal Land Dispute Assault: श्रीस्थळ येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत काल मारामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Published on

काणकोण: श्रीस्थळ येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कुष्ठा वेळीप व भिसो वेळीप यांनी व ४१ अन्य जणांनी हेतूपुरस्सर जमाव करून मारहाण केल्याचे तक्रारदार एका महिलेने पोलिसात केली आहे.

एका महिलेच्या अंगालाही हात लावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांना ढकलून त्यांना मारझोड केली.

Goa Crime News
Goa Crime: नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 30 लाख; तरुणीकडून तक्रार दाखल

याच्या उलट चंद्रशेखर वेळीप यांनी कुष्ठा वेळीप व भिसो वेळीप व अन्य सोळा जणांनी अपशब्द वापरून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लाकडी दंडुके, लोखंडी कुलूप घेऊन त्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Goa Crime News
Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

या मारहाणीत जखमी झालेले कुष्ठा वेळीप व भिसो वेळीप यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनुराधा देसाई व रामदास डोईफोडे पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com