Ganga Pujan: विठ्ठल, विठ्ठल! मुळगावात देवी केळबाई मंदिरात ‘गंगापूजन’ सोहळा उत्साहात

Shri Kelbai Mandir: विठ्ठलनामाचा जयघोष आणि शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीत मुळगाव येथे महामी उत्सव अर्थात ‘गंगापूजन’ सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Gangapujan Mulgao
Kelbai TempleDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: विठ्ठलनामाचा जयघोष आणि शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीत मुळगाव येथे महामी उत्सव अर्थात ‘गंगापूजन’ सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुळगाव येथील श्री देवी केळबाईच्या मंदिरात (रविवारी) पार पडलेल्या या सोहळ्याला वारकरी आणि विठ्ठलभक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे मुळगाव येथे साक्षात पंढरी अवतरल्याची अनुभूती आली.

श्री केळबाई सातेरी वारकरी संस्थेतर्फे हा सोहळा साजरा करण्यात आला होता. पंढरपूरपर्यंत पायीवारी करून आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा तिरी भरलेल्या भक्ती मेळ्यात सहभागी होऊन आणि विठूमाऊलीचे दर्शन घेऊन परतताना वारकऱ्यांनी चंद्रभागेचे तीर्थ (गंगा) आणले होते. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीसह हे तीर्थ पूजन करून महामी (म्हामणी) घालण्यात आले.

Gangapujan Mulgao
Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

यानिमित्त माऊली भक्तांकडून भजन, दिंडी झाल्यानंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला. सायंकाळी महिलांतर्फे भजन झाले. श्री केळबाई सातेरी वारकरी संस्थेच्या बॅनरखाली यंदा १४० वारकऱ्यांनी पंढरपूरपर्यंत पायीवारी केली होती.

Gangapujan Mulgao
Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

...तरी पायीवारी करावी!

पायीवारी केल्याने जीवनात पुण्यप्राप्ती होते. जन्मा येऊनी पायीवारी करावी. पायीवारी केल्याने मोक्षप्राप्ती मिळते. असे याप्रसंगी मार्गदर्शन करताना संजयबुवा पाटील यांनी सांगून, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पायीवारी करावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते शिस्तबद्ध वारकरी म्हणून पांडुरंग जोशी यांचा सन्मान करण्यात आला. श्री विठ्ठलमाऊलीच्या कृपेने यंदाही पायीवारी निर्विघ्नपणे पार पडली, असे संस्थेचे संस्थापक वसंत गाड आणि अन्य वारकऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com