Madkai News : नवदुर्गा प्रकटोत्सवाला जल्लोषात प्रारंभ; मडकई भाविकांची मोठी उपस्थिती

Madkai News : या उत्सवात दुपारी मशाल प्रज्वलन करून प्रकट कार्यक्रम सुरू झाला. या उत्सवाचे एक प्रणेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात आले.
Madkai
Madkai Dainik Gomantak
Published on
Updated on

Madkai News :

मडकई, येथील भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या श्री नवदुर्गा देवीचा प्रकटोत्सव भाविकांच्या उपस्थितीत व उत्साहात साजरा झाला. आज (शुक्रवारी) नवदुर्गा गावशीकान्न देवीच्या प्रकटोत्सवाला सुरवात झाली असून उद्या (शनिवारी) या उत्सवाची सांगता होणार आहे.

पारंपई -मडकई येथील श्री नवदुर्गा गावशीकान्न प्रकटस्थानावर हा उत्सव साजरा झाला. सकाळपासून श्रद्धास्थानावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सकाळी अभिषेक व इतर विधी झाल्यानंतर सार्वजनिक श्री नवदुर्गा सप्तशती महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीच्या चरण पावलांचा दर्शन सोहळा झाला.

या उत्सवात दुपारी मशाल प्रज्वलन करून प्रकट कार्यक्रम सुरू झाला. या उत्सवाचे एक प्रणेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात आले. भाविकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात श्रीचा दर्शन सोहळा झाला. यावेळी देवस्थान समितीचे इतर पदाधिकारी व भाविक भक्त यांची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यक्रमात तिमणो गावडे तसेच चित्रकार शेखर आडपईकर यांचा सन्मान करण्यात आला. शेखर आडपईकर आणि नरेंद्र तारी यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Madkai
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

नवदुर्गा गावशीकान्नीच्या नावाचा जल्लोष!

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्रकटस्थानावर श्रीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यंदाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी या प्रकटस्थानावरील उत्सवात वाढ होत असून भाविकांकडून नवमी तसेच इतर उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. यावेळी महाप्रसादही असतो. उत्सवावेळी श्रीच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com