Bodgeshwar Temple: श्री बोडगेश्‍वरचरणी आज सोन्याची मशाल

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वरला मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्याची मशाल शनिवारी अर्पण केली जाणार आहे
 Bodgeshwar Temple |Vishwajit Rane
Bodgeshwar Temple |Vishwajit RaneDainik Gomantak

Bodgeshwar Temple: म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वरला मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्याची मशाल शनिवारी अर्पण केली जाणार आहे, अशी माहिती अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली.

शुक्रवारी संध्याकाळी देवस्थान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर व उपमुखत्यार पांडुरंग वराडकर उपस्थित होते. मंत्री राणे यांनी यंदा जत्रोत्सवावेळी देवदर्शन घेतल्यानंतर आपल्या वडिलांच्या वाढदिनी देवाला सोन्याची मशाल अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानुसार त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा 28 रोजी वाढदिवस असल्याने ही मशाल देवाला अर्पण केली जाणार आहे.

 Bodgeshwar Temple |Vishwajit Rane
Mining in Goa: ...यामुळे गोवा खाण विभागाची केंद्राकडून कानउघडणी

यानिमित्त सकाळी 10 वा. मंदिरात लघुरूद्र व मशालीचे शुद्धीकरण झाल्यानंतर सदर मशाल देवस्थानाकडे सुपूर्द केली जाईल.

मंत्री राणे व त्यांची पत्नी आमदार दिव्या राणे यांच्या यजमानपदाखाली हा विधी होतील. दुपारी 1.30 वा. देवाला मशाल अर्पण केली जाईल. त्यानंतर आरती व महाप्रसाद होईल.

 Bodgeshwar Temple |Vishwajit Rane
Smart City Panjim: ...यामुळे पणजीतील कामे 15 मार्चनंतर बंद

2024 मध्ये सोन्याचा फेटा!

देवस्थान श्रीमंत बनविण्याकडे समितीने वाटचाल सुरू केली आहे. येत्या 2024 च्या जत्रोत्सवावेळी देवाला सोन्याचा फेटा अर्पण केला जाणार आहे. या फेट्यावर दीड ते दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

देवस्थानचा निधी न वापरता राजदांड्याप्रमाणे भाविकांकडूनच हा पैसा उभा केला जाईल, अशी घोषणा करून ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीला प्रसाद लावूनच या सर्व गोष्टी केल्या जातात, असे स्पष्टीकरण भाईडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com