Shramdham Yojana: ‘श्रमधाम’मधून आणखी 50 नवी घरे, सभापती तवडकरांचा दावा; वायनाड-केरळ येथे उभारणार 3 निवासस्थाने

Ramesh Tawadkar: प्रस्तावित ५० घरांमध्ये वायनाड, केरळ येथे बांधण्यात येणाऱ्या तीन घरांचा समावेश आहे, असे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी मडगावात सांगितले.
Ramesh Tawadkar, Shramdham Yojana
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गत दोन वर्षांत राज्यातील विविध भागांमध्ये श्री बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनने निवारा नसलेल्यांना श्रमधाम योजनेअंतर्गत ४० घरे बांधून दिली. आता आणखी ५० घरे बांधण्याचा संकल्प असून त्यासाठी संपूर्ण गोव्यामध्ये कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रस्तावित ५० घरांमध्ये वायनाड, केरळ येथे बांधण्यात येणाऱ्या तीन घरांचा समावेश आहे, असे सभापती तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी शनिवारी मडगावात सांगितले. मडगावच्या रवींद्र भवनात राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ गावस देसाई, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत तवडकर यांनी श्रमधाम योजनेचा आढावा घेतला. या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रशंसा केली आहे. प्रत्येक तालुक्यात निवारा नसलेल्यांना, तसेच अत्यंत गरिबीत जीवन व्यथित करणाऱ्या गरजवंतांना ही घरे बांधून दिली जात आहेत. या कामाला प्रत्येक क्षेत्रातून भरघोस पाठिंबा मिळत आहे. श्रमधाम संकल्पनेतून समाज सुधारणेचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ramesh Tawadkar, Shramdham Yojana
Shramdham Yojana: प्रियोळमध्ये निराधार व गरजूंना सहा घरे; श्रमधाम योजनेतून लाभार्थ्यांना चाव्या वितरित

कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारणार

गोव्यात प्रत्येक गावात कमीत कमी २ ते ३ टक्के लोक अविकसित आहेत. पूर्वीचे गावपण नाहीसे होताना दिसत आहे. राजकारणाची दिशा बदलली आहे. गोव्याच्या भल्याचा विचार करणारे कार्यकर्ते नाहीत, ही चिंतेची बाब असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत, असेही तवडकर यांनी सांगितले.

Ramesh Tawadkar, Shramdham Yojana
Shramdham Yojana: माणुसकीसाठी ‘श्रमधाम’ संकल्पना! पेडणेवासीयांनी ‘लोकोत्सवात' सहभागी व्हावे; तवडकरांचे आवाहन

वायनाडला ५० कार्यकर्ते जाणार

वायनाड-केरळ येथे ३० जुलै २०२४ रोजी प्रचंड भूस्खलन झाले. त्यात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. मात्र, सरकारने अद्याप त्यांना निवारा बांधून दिलेला नाही. मी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यासमवेत या भागाची पाहणी केली आणि तिथे तीन घरे बांधण्याचा संकल्प केला. आता २ एप्रिलपासून हे काम सुरू होणार असून, ५० कार्यकर्त्यांचा गट गोव्याहून वायनाडला जाऊन १५ दिवसांत ही घरे बांधून देण्याचा प्रयत्न करील, अशी माहिती तवडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com