Goa News : युवकांना योग्य दिशा दाखवा! रोहन खंवटे

Goa News : ‘विकसित भारत’मध्ये मडगावात कलाकार, क्रीडापटूंशी साधला संवाद
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

सासष्टी, कलाकार, खेळाडू तसेच युवकांकडून त्यांच्या सूचना जाणून घेणे, तसेच विकसित भारत साकारताना युवकांना योग्य दिशेने नेणे, हासुद्धा एक प्रमुख हेतू आहे. कलाकार आणि खेळाडू यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सरकार योग्य निर्णय घेणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

सध्या भाजपतर्फे विकसित भारत मोहिमेअंतर्गत समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू आहे. बुधवारी मडगावात कलाकार आणि क्रीडापटू यांच्याशी संवाद साधण्यात आला.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, भाजपचे प्रवक्ते शर्मद पै रायतूरकर, भाजपचे राज्य सरचिटणीस दामोदर नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आदी मान्यवरांबरोबर नाटक, संगीत क्षेत्रातील कलाकार तसेच खेळाडू, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, माजी क्रीडा प्रशासक, क्रीडापटू, प्रशिक्षक, शारीरिक शिक्षक उपस्थित होते.

Goa
Goa Congress: समन्वय समितीचा पत्ता नाही, केव्हा होणार काँग्रेस उमेदवार जाहीर? शरद पवारांची राष्ट्रवादी नाराज

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, क्रीडा योजना तयार करून ती कार्यान्वित करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याप्रसंगी दामोदर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र तालक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू तथा प्रशिक्षक दिलीप नाईक यांनी केले.

‘ऑलिंपिक’साठी खेळाडू घडविणार : आमदार दिगंबर कामत म्हणाले की, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील घटकांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदैव खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेतली आहे. ऑलिंपिकमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकावी, यासाठीच सरकार खेळाडूंसाठी विविध योजना राबवित असल्याचेही कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com