गोव्यात घर शाकारणीला मिळेनात मजूर! घरमालक चिंतेत, उत्तर प्रदेश अन् बिहारमधील मजुरांवर मदार

Traditional Roofing In Goa: पूर्वी गोव्यात जास्तीत जास्त कौलारू घरे असायची, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात एप्रिल, मे महिन्यांमध्ये घरांची शाकारणी केली जाईची. घरावरील कौल काढून ती स्वच्छ करून पुन्हा घातली जायची.
Goa roofing traditions
Traditional Roofing In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: पूर्वी गोव्यात जास्तीत जास्त कौलारू घरे असायची, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात एप्रिल, मे महिन्यांमध्ये घरांची शाकारणी केली जाईची. घरावरील कौल काढून ती स्वच्छ करून पुन्हा घातली जायची. आता बहुतांश कॉंक्रिटची घरे उभारण्यात येत असल्याने घर शाकारणीची गरज पडत नाही. मात्र अजूनही जी घरे कौलारू आहेत, त्या घरांची नियमित शाकारणी केली जाते. अनेक ठिकाणी सध्या शाकारणीची कामे सुरू असल्याचे दिसून येते.

सध्या घर शाकारणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरमालक चिंतेत आहेत. घराची शाकारणी टाळण्यासाठी काही घरमालकांनी कौलांवर पत्र्यांचे आच्छादन घालणे पसंत केले आहे. पूर्वी ही कामे करणारी माणसे मोठ्या प्रमाणात होती. ती या कामात सराईत असायची. हे जोखमीचे आणि कौशल्याचे काम असते. काही घरमालकांचे घर साकारणारे मजूर हे ठरलेले असायचे, ते दरवर्षी नियमित येऊन घर शाकारणी करून द्यायचे.

Goa roofing traditions
Roof Collapses At Quepem: मोठा अनर्थ टळला! शाळेचे छत उडून कोसळले आवारात; सुदैवाने कोणासही इजा नाही

आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, घर शाकारणीसाठी मजूर मिळत नाही. जे गोमंतकीय पूर्वी हे काम करायचे ते त्यापैकी आता बरेचजण हयात नाही. गोमंतकीय युवावर्गही अशी कामे करायला बघत नाही. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, बिहार (Bihar) आलेले मजुरांना घेउन घरमालकाला हे काम करून घ्यावे लागते.

Goa roofing traditions
Traditional Fishing in Goa: गोव्यातील पारंपारीक मासेमारी, समुद्राशी नाळ जोडणारा वारसा

मिलाग्रेस फर्नांडिस म्हणतात...

घर शाकारणीचे काम करणारे मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले की, आता जास्त गोमंतकीय हे काम करीत नाही. पूर्वी आपले वडील हे काम करायचे. गेली २५ ते ३० वर्षांपासून आपण हे काम करीत आहे. आपली काही ठरलेली घरे आहेत, त्यांचेच काम आपण करतो. दहा बारा वर्षांपूर्वी जास्त घरे होती. पण आता सर्वत्र इमारती उभ्या राहिल्या आहेत. केवळ एप्रिल, मे महिन्यामध्ये आपण हे काम करतो. बाकी दिवसांत शेती करत असतो, असे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com