राज्यभरात ‘टिका उत्सव’ ला अल्प प्रतिसाद

फक्त 2721 जणांनी घेतला ‘बुस्टर’ : अद्यापही पात्र 1 लाख 76 हजार नागरिक उदासीन
Covid 19 Vaccination
Covid 19 VaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता गृहित धरून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आज रविवारी राज्यभर टिका उत्सव आयोजित केला होता. मात्र, या उत्सवाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अद्यापही 1 लाख 76 हजार नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नाही. आज केवळ 2 हजार 721नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीही आज पणजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेतला.

(Short response to corona Vaccination across the goa state)

Covid 19 Vaccination
बेकायदेशीर मसाज पार्लर, नाईट क्लबवर कारवाई करा: मुख्यमंत्री सावंत

राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे राज्य सरकारच्या वतीने लसीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोर्बिवॅक्स ही लस देण्यात येत असून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन ही लस देण्यात येत आहे.

याशिवाय प्रामुख्याने साठ वर्षावरील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर यापूर्वीच्या विविध आजाराने आजारी असलेले नागरिक यांना बूस्टर डोस घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, नागरिक टाळाटाळ करत आहे. ही बाब जीवघेणी असू शकते. त्यामुळे डोस घ्यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 262

राज्यात आज कोरोनाचे नवे 41 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर वाढून 7.05 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा शंभराच्यावर जावून 262 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 23 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 929 रुग्ण बरे झाले. काल दिवसभर 581 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

bingson john conman arrested raipur
Goa Police Seniority Dispute Case
mandar surlakar murder case goa
goa archives department digitization
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com