Lokotsav Goa 2023: लोकोत्सवाच्या अखेरीला खरेदी वाढली

लोकोत्सवाचा समारोप जवळ आला तशी विविध हस्तकला स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी वाढून विक्रीही बऱ्यापैकी होऊ लागली आहे.
Lokotsav Goa 2023
Lokotsav Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Lokotsav Goa 2023: लोकोत्सवाचा समारोप जवळ आला तशी विविध हस्तकला स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी वाढून विक्रीही बऱ्यापैकी होऊ लागली आहे. काही चाणाक्ष ग्राहक शेवटच्या दिवशी स्टॉल्सवर विविध वस्तू स्वस्तात विकल्या जातात म्हणून खरेदी करायला थांबले आहेत.

महालक्ष्मी गृहउद्योग कोल्हापूर या विजय व प्राजक्ता नाईक यांच्या एच-109 स्टॉलवर विविध प्रकारचे सांडगे व राईस पापड घ्यायला एकच गर्दी असते. कारण तांदूळ, साबुदाणा, लसूण, पालक, नाचणी, टोमॅटो, जिरा असे विविध फ्लेवर्स आणि कोणतेही केमिकल रंग त्यात वापरलेले नाहीत. सर्व काही ऑर्गेनिक.

मुख्य म्हणजे प्रत्यक्ष तळून ग्राहकांना चव चाखून खरेदी करायची मुभा दिली जाते. दोनशे ग्रॅमची तीनशे रुपयांत पाच पाकिटे अशी ऑफर असल्याने लोकही खूश असतात व काल आलेला ग्राहक पुन्हा येतो असा त्यांचा अनुभव आहे. लोकोत्सवात प्रथमच हा स्टॉल लावला आहे.

Lokotsav Goa 2023
Goa News: पिळये-धारबांदोडा भूमिका मंदिरात चोरी

हे स्टॉल्स लक्ष वेधतात

  • जयपूर येथील रतनलाल कटारिया यांच्या 753 क्रमांकाच्या स्टॉलवर ग्लासवर्क असलेले विविध आकारातील कंदील, बॉक्स, ट्रे, दीप लक्ष वेधून घेतात. त्यात भरपूर कलात्मक विविधता आहे. एलइडी लाईटमुळे हे दिवे उजळून दिसतात.

  • कालापूर येथील पूजा गावडे यांच्या 202 क्रमांकाच्या श्रीयश बँगल्स स्टॉलवर गोल्ड प्लेटेड वैविध्यपूर्ण बांगड्या, मंगळसूत्र, माळा, पेंडंट असे अलंकार आहेत. राजस्थानी पारंपरिक बांगड्याही त्यांच्या स्टॉलवर आहेत.

आज समारोप : बुधवार, 8 रोजी लोकोत्सवाचा समारोप असल्याने मंगळवारी (7 रोजी) खरेदीसाठी लोकांनी बरीच गर्दी केली होती. लोकोत्सवाच्या उत्तरार्धात गुजरातचे सिद्धी धमाल व महाराष्ट्रातील लावणी व कोळी नृत्याने बहार आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com