Goa Shivsena: सांडपाणी समस्या सोडवा; शिवसेनेचे निवेदन

Margao Municipality Sewage Water Issue: निवेदनाची दखल घेऊन मडगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
Margao Municipality Sewage Water Issue: निवेदनाची दखल घेऊन मडगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
Sewage Water PotholesCanva
Published on
Updated on

मडगाव नगरपालिका इमारती मागील रस्त्यावर गेले कित्येक दिवस सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याची दखल शिवसेनेने घेतली असून या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मडगाव आरोग्य केंद्र, पोलिस निरीक्षक, कार्यकारी अभियंता मलनिस्सारण विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते फातोर्डा यांना निवेदन दिले आहे.

शिवसेनेचे विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन १९ रोजी मडगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. केंद्राच्या पाहणीत गोवा सार्वजनिक आरोग्य कायदा (१९८५ चा कायदा २५) च्या कलम ३७ अन्वये आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा उपद्रव आहे. यावर तातडीने उपाय योजनेसाठी सहाय्यक अभियंता विद्यानगर, मडगाव यांना निर्देश दिल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com