Bicholim Lift Problem: शिवाजी महाराज संकुलातील दोन्ही 'लिफ्ट' वर्षभरापासून बंद; डिचोलीतील नागरिकांची गैरसोय, ज्येष्ठांची तर मोठी परवड

Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts: डिचोली बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल या मार्केट प्रकल्प इमारतीच्या दोन्ही ‘लिफ्ट’ बंद असल्यामुळे जनतेची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे.
Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts
Bicholim Lift ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल या मार्केट प्रकल्प इमारतीच्या दोन्ही ‘लिफ्ट’ बंद असल्यामुळे जनतेची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. दुसऱ्याबाजूने प्रकल्प इमारतीत अस्वच्छता पसरली आहे.

जी-सुडातर्फे डिचोली पालिकेच्या चौथ्या टप्प्यातील मार्केट प्रकल्प बांधण्यात आला आहे. २०२० साली या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पात दोन ‘लिफ्ट’ बसवल्या. मात्र दोन्ही वर्षभरापासून बंदच आहेत. या लिफ्ट कार्यान्वित करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.

Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts
Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

या संकुलाच्या पहिल्या मजल्यावर वकीलांची कार्यालये तर दुसऱ्या मजल्यावर नागरी पुरवठा आणि भू-सर्वेक्षण या सरकारी खात्यांची कार्यालये आहेत. दरम्यान, ‘लिफ्ट’ त्वरित कार्यान्वित करा, अशी सूचना सहा महिन्यांपूर्वी संबंधित कंत्राटदाराला दिली होती, अशी माहिती डिचोलीचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी दिली.

इमारतीत अस्वच्छता

मार्केट प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर या इमारतीच्या देखभालीबाबत कोणतेच नियोजन केलेले नाही. परिणामी या इमारतीत अस्वच्छता निर्माण होत आहे. काहीजण तर मद्यप्राशन करून या इमारतीत झोपतात, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असते. कचऱ्याचीही वेळेत उचल होत नाही. अशी तक्रार दुकानदारांसह अन्य आस्थापनवाल्यांनी केली आहे. देखभाल कर घेण्यात येतोय. मात्र प्रत्यक्ष देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार दुकानदारांनी केली.

Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts
Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com