डिचोलीत शुक्रवारी ‘शिंदेसेने’चा मेळावा रणनीती ठरणार: महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची उपस्थिती

Shiv Sena Shinde Faction Goa: शिवसेनेचा (शिंदे गट) गोवा राज्य कार्यकारिणी मेळावा येत्या शुक्रवारी (ता. १५) डिचोलीत आयोजित करण्यात आला आहे.
Shiv Sena Shinde Faction Goa
Shiv Sena Shinde Faction GoaDainiak Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिवसेनेचा (शिंदे गट) गोवा राज्य कार्यकारिणी मेळावा येत्या शुक्रवारी (ता. १५) डिचोलीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरणार आहे.

येथील हिराबाई स्मृती मिनी सभागृहात सायंकाळी ४ वा. या मेळाव्याला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी ३२ वर्षांपूर्वी शिवसेनेने स्थापन केलेल्या जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) राज्यप्रमुख उपेंद्र गावकर आणि सचिव काशिनाथ मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Shiv Sena Shinde Faction Goa
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

यावेळी डिचोली तालुका प्रमुख अनिल नाईक, मये मतदारसंघ रुपेश किनळकर आणि पिळगाव शाखा प्रमुख आश्विन नाईक उपस्थित होते. शिवसेनेचे महाराष्ट्रातील नेते गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मेळाव्यात महाराष्ट्रातील उद्योगमंत्री उदय सामंत, सचिव संजय मोरे, बालाजी खटगावकर व गोवा संपर्क प्रमुख सुभाष सावंत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपेंद्र गावकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com