Shiroda Constituency : तरवळे परिसरात पल्लवी धेंपेंना मताधिक्य शक्य : माजी सरपंच संदेश प्रभुदेसाई

Shiroda Constituency : शिरोडा पंचायत क्षेत्रातील प्रभाग एकमधील परिसरात काल कार्यकर्त्यांसह घरोघर फिरून प्रचार केल्यानंतर ते बोलत होते.
Shiroda
ShirodaDainik Gomantak

Shiroda Constituency :

शिरोडा मतदारसंघातील तरवळे, मैंगाळ डोंगर, करपणे, भाटले हा परिसर भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना या भागात शंभर टक्के मते मिळणार आहेत.

जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या कुशल नेतृत्वाने शिरोडा मतदारसंघातून पल्लवी धेंपे यांना प्रचंड मते मिळून त्या विजयी होतील, असे प्रतिपादन शिरोड्याचे माजी सरपंच संदेश प्रभुदेसाई यांनी केले.

शिरोडा पंचायत क्षेत्रातील प्रभाग एकमधील परिसरात काल कार्यकर्त्यांसह घरोघर फिरून प्रचार केल्यानंतर ते बोलत होते.

Shiroda
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्‍वास प्रभुदेसाई, राजू देसाई, पंच सदस्य सुनील नाईक, नरसिंह शिरोडकर, सुभाष गावकर, शेखर गावकर, सचिन सावकर, प्रदीप भट, दामू शिरोडकर, संदीप नाईक बोरकर, प्रशांत शिरोडकर या मान्यवरांबरोबर अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विश्‍वास प्रभुदेसाई यांनी सांगितले, की आपल्या देशाच्या हितासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी असणे ही काळाची गरज आहे. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पल्लवी धेंपे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com