आरोग्य खात्याचा गलथान कारभार! रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जखमी रुग्णाचा मृत्यू

South Goa District Hospital Death Case: तब्बल एक तास रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने अतिरक्तस्राव होऊन रुग्णाने प्राण सोडले
South Goa District Hospital Death Case: तब्बल एक तास रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने  अतिरक्तस्राव होऊन रुग्णाने प्राण सोडले
Shirish Kane|South Goa District Hospital Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: इस्पितळात आणलेल्या रुग्णाला गोमेकॉ इस्पितळात रेफर करणे, एवढेच काम करत असल्यामुळे ''रेफरल हॉस्पिटल'' असे नाव पडलेल्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात काल आणखी एक संतापजनक प्रकार घडला. रस्ते अपघातातील जखमी रुग्णाला गोमेकॉ इस्पितळात हलविण्यासाठी तब्बल एक तास रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने तोपर्यंत अतिरक्तस्राव झाल्याने गोमेकॉत पोहोचल्यावर त्या रुग्णाने प्राण सोडले.

मडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिरीष पै काणे (५५) हे शनिवारी रात्री कोलमोरोड-नावेली येथील आपल्या घराजवळच रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने आलेल्या एका गाडीने त्यांना ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत त्यांना मडगाव जिल्हा इस्पितळात आणले असता तेथे त्यांच्यावर उपचार करण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्यांना गोमेकॉत पाठविण्याचे ठरविले.

मात्र, त्यांना गोमेकॉत हलविण्यासाठी सुमारे एक तास रुग्णवाहिकाच उपलब्ध न झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. शेवटी कशीबशी रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांना गोमेकॉत हलविले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यांचे प्राण वाचविण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पहाटेच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्णवाहिका आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने आणखी एकाचा जीव गेला, अशी प्रतिक्रिया यावेळी काणे यांच्याबरोबर इस्पितळात असलेले मडगाव येथील युवा नेते प्रभव नायक यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची मोठमोठी भाषणे आणि आश्वासनांमुळे रेफरल सेंटर बनलेल्या इस्पितळाचे कामकाज कोलमडले आहे. राणे यांनी या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून त्वरित कृती करावी. अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी नायक यांनी केली.

शनिवारच्या या प्रसंगाची एकूण माहिती देताना नायक म्हणाले, मी काल रात्री मडगाव इस्पितळात हजर होतो. इस्पितळात काहीच यंत्रणा दिसत नव्हती. रात्री ड्युटीवर असलेले डॉक्टर हतबल दिसत होते. काल रात्री स्थानिक आमदारांच्या मुलासह अनेक नामवंत नागरिक उपस्थित असताना ही स्थिती असेल, तर सर्वसामान्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पनाच करवत नाही, असे प्रभव नायक म्हणाले.

मी लवकरच मडगावमधील प्रमुख नागरिकांची वैयक्तिक भेट घेऊन जिल्हा इस्पितळ सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन, असे नायक म्हणाले.

दक्षिण गोव्यातील नागरिकांनाही आम्हाला पाठिंबा देण्याचे मी नम्र आवाहन करतो. आता सर्वसामान्यांना भेडसावणारी आरोग्याशी निगडित समस्या संपवण्याची वेळ आली आहे. अपघात आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना वेळेत इलाज न मिळणे हे दुर्दैवी आहे, असे नायक म्हणाले.

South Goa District Hospital Death Case: तब्बल एक तास रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने  अतिरक्तस्राव होऊन रुग्णाने प्राण सोडले
Goa Crime: पार्किंगच्या वादातून हवेत गोळीबार! नेमबाजी स्पर्धेतील प्रशिक्षकाचे कृत्य

मित्रांना भेटण्यासाठी जाताना अपघात

शनिवारी रात्री शिरीष काणे यांना भेटण्यासाठी त्यांचे काही मित्र आले होते. त्यांना भेटण्यासाठी रस्ता ओलांडून जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी कारचालक समीर हुबळीकर (रा. काणकोण) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज (रविवारी) सायंकाळी काणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. त्यांच्या निधनावर आमदार दिगंबर कामत, तसेच नगरसेवक महेश आमोणकर यांनी दुःख व्यक्त केले.

काणे यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर बनली होती. त्यामुळेच त्यांना गोमेकॉत हलविण्याचे ठरविले. पण त्यासाठी ॲडव्हान्स लाईफ सेव्हींग सुविधा असलेली रुग्णवाहिका हवी होती. अशी रुग्णवाहिका दक्षिण गोव्यात एकच आहे. तिला आम्ही बोलावले; पण ती दुसरीकडे गुंतलेली असल्याने ती इस्पितळात पोहोचण्यास थोडा उशीर झाला. आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्व ते उपाय केले; पण दुर्दैवाने रुग्णाचा प्राण वाचू शकला नाही.

डॉ. राजेंद्र बोरकर, अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com