Marcel News : महिलांनी स्वावलंबी बनावे; 'शिल्पा सावंत'

श्री शांतादुर्गा महिला संघटनेचा विसावा वर्धापनदिन व श्री महा महिला संघाचा सातवा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
shilpa Sawant
shilpa SawantDainik Gomantak
Published on
Updated on

माशेल : महिलांनी संघटित राहून समाजकार्य करावे, महिलांनी सक्षम राहावे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे, घरातली स्त्री जर सक्षम असेल, तर मुलांना योग्य मार्गदर्शन करु शकते, हे सर्व करत असताना सकारात्मक विचार मनात असावे. घरातल्या सर्व मंडळींना समजून घेऊन सजगपणे कार्य करावे, असे प्रतिपादन शिल्पा सावंत यांनी केले. shilpa sawant say woman development is important

श्री शांतादुर्गा महिला संघटनेचा विसावा वर्धापनदिन व श्री महा महिला संघाचा सातवा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी ‘संजीवनी सुखात आलय’ या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या उद्‌घाटनाला भागशिक्षणाधिकारी शिल्पा सावंत, सुचिता तारी, लालन बहनजी या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच माजी सरपंच उन्नती नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, उपाध्यक्ष रक्षदा भगत, खजिनदार रसिका भगत, संघटनेच्या संस्थापक संगीता प्रभूम्हापणे तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

shilpa Sawant
Marcel News - तातडीने रस्ता दुरुस्तीची माशेल स्थानिकांची मागणी | Gomantak Tv

सुचिता तारी यांनी महिलांनी एकमेकांना प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले. ब्रह्माकुमारी लालन बहनजी यांनी, ध्यान करावे जेणेकरून आपले शरीर चांगले राहते. याचा उपयोग आपल्या जीवनात जास्त होऊ शकतो. शरीर, आचार, विचार, उच्चार शुध्द व चांगले असावे. यामुळे स्वतःचा संसार सुखाचा होऊ शकतो, याबद्दल माहिती दिली.

shilpa Sawant
Marcel Chikhal Kalo - मार्शेल येथील प्रसिद्ध 'चिखल कालो ' उत्साहात साजरा | Gomantak TV

वर्धापनदिनानिमित्त पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी मूगापासून बनलेल्या पदार्थात प्रथम- शर्मिला भगत, द्वितीय- शांती नाईक तर तृतीय - रसिका भगत यांना प्राप्त झाला. शिल्पा सावत व सुचिता तारी यांचा संघटनेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रक्षदा भगत यांनी केले तर संगीत प्रभूम्हापणे यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com