Shigmo Festival Goa: मिरवणूक पारंपरिक मार्गानेच; पालिकेच्या बैठकीत निर्णय

शिमगो मिरवणूक पारंपारीक म्हणजेच होली स्पिरिट चर्च मडगाव ते नगरपालिका इमारत या मार्गाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
Shigmo Festival Goa
Shigmo Festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Shigmo Festival Goa: मडगाव नगरपालिकेच्या कौन्सिलची बैठक शुक्रवार, 27 रोजी पार पडली. या बैठकीत यंदा कार्निव्हल व शिमगो मिरवणूक पारंपारीक म्हणजेच होली स्पिरिट चर्च मडगाव ते नगरपालिका इमारत या मार्गाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यामुळे बैठकीच्या वेळी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच मडगाव शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ही मिरवणूक गेली पाच वर्षे जुन्या मार्केटमधील एसजीपीडीए मैदान ते रवीन्द्र भवनमार्गे दामोदर लिंग अशी आयोजित करण्यात येत होती, असे गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी विरोध करताना सांगितले.

पण भाजपच्या नगरसेवकांनी ही मिरवणूक पारंपरिक मार्गानेच व्हायला पाहिजे, असा हट्ट धरला. वाहतुकीची कोंडी होणार नाही, वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे, या मार्गावर मिरवणूक काढल्यास मडगावकरांनाही आनंद होईल.

Shigmo Festival Goa
Goa News: लाचप्रकरण बंद करण्यास न्यायालयाचा नकार कारण...

शिवाय हॉस्पिसियो इस्पितळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात स्थलांतरित केल्याने आवाजाचा परिणाम जाणवणार नाही, असे भाजपच्या नगरसेवकांचे मत होते.

यंदा गोव्यात कार्निव्हल महोत्सव 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला असून मडगावमधील मिरवणूक रविवार, 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. गोव्यात शिमगोत्सव 8 ते 21 मार्च रोजी फोंडाहून सुरू होईल. मात्र, मडगावच्या शिमगोत्सव मिरवणुकीचा दिवस निश्र्चित झाला नसल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

Shigmo Festival Goa
Goa Tourism: पर्यटन करा मात्र उघड्यावर स्वयंपाक नको...नाहितर भरावा लागेल इतका दंड

बैठकीत असे झाले निर्णय

दारोदारी कचरा गोळा करणाऱ्या बापू एन्व्हायरमेंट कंपनीचे कंत्राट एका महिन्याने म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्यावरील भटक्या गुरांचा प्रश्र्न सोडविण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी नगरपालिकेने गोमंतक गोसेवा महासंघाकडे प्राथमिक करार करण्याचा विषय चर्चेस आला.

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नगरपालिकेला निधी मंजूर झाला होता. त्यातून फातोर्डा व मडगाव इथे एक-एक फुटसाल मैदान तयार करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडण्यात आला.

त्यास सरकारने मंजुरी दिली असून अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून ही मैदाने तयार केली जातील. पण तत्पूर्वी ज्या जागेची कायदेशीर हक्क वगैरे तपासूनच पुढील पाऊल टाकले जाईल, असा निर्णय घेतला गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com