सासष्टी: कोकणी भाषा मंडळातर्फे शणै गोंयबाब कथामालिका स्पर्धेची केंद्रीय फेरी २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ तालुक्यांतील १८ केंद्रावर होणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी १६०हून अधिक परीक्षक तसेच ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करणार आहेत, अशी माहिती मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकणी भाषा मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी दिली.
कार्यकारी समिती सदस्य पलाश अग्नी तसेच स्पर्धेचे संयुक्त संयोजक यतिन नायक उपस्थित होते. या स्पर्धेपूर्वी शिक्षक, प्रशिक्षक तसेच संयोजक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सर्व प्रथम शालेय स्तरावर आंतर वर्ग कथा स्पर्धा आयोजित करुन त्यातील पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या गटातील यशस्वी स्पर्धक केंद्रीय फेरीत सहभागी होणार आहेत, असे दिवकर यांनी सांगितले.
स्पर्धेची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा १ सप्टेंबर रोजी मडगावात कोकणी भाषा मंडळात आयोजित करण्यात आली आहे. केवळ शाळेतून आलेल्या स्पर्धकांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल. केवळ खास क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या वेळी सुद्धा येऊन आपली कथा सादर करता येईल असे पलाश अग्नी यांनी सांगितले.
कथामालिके व्यतिरिक्त कथा लेखन स्पर्धाही जाहीर करण्यात आली आहे. नवीन कथा लिहिणाऱ्यांनी कथेची प्रत आणि प्रतिज्ञापत्रासह संबंधित केंद्रावरील कथा मालिका संयोजकांकडे देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या संयोजक शलाका देसाई व सह संयोजत यतिन नायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
काणकोण - श्रद्धानंद विद्यालय पैंगीण (सज्जन गांवकर, रुपेश वरक संयोजक), धारबांदोडा - श्रीमती हिराबाई तळावलीकर हायस्कुल, साकोर्डा (अमेय नायक, मोरेश्र्वर च्यारी), सांगे - मिरेकल्स हायस्कूल (मिथुन गुरव, मनीशा कुंकळेकर), मडगाव १ व २ - कोकणी भाषा मंडळ (राणी कामत, खुशी प्रभुदेसाई),
पेडणे - ए डी ई आय कार्यालय (केशव महाले, वेलंकी पेडणेकर), सत्तरी - सरकारी विद्यालय, वाळपई (समिक्षा शेट शिरोडकर, नमन सावंत धावस्कर) या सर्व केंद्रावर सकाळी ९ वाजता स्पर्धा सुरु होईल.
फोंडा १ व २ - पी ई एस शिक्षणशास्त्र महाविद्यालय (सान्वी खांडेपारकर, चेतन खेडेकर), कुंकळ्ळी - सीईएस महाविद्यालय ( आश्र्विनी च्यारी, सबिना मुल्ला), केपे - सर्वोदय हायस्कूल, कुडचडे ((ब्रिजेश शेट देसाई, साईशा शेट शिरोडकर), डिचोली - सरकारी माध्यमिक शाळा (प्रणिता शिरगावकर, राधिका कामत सातोस्कर),
मुरगाव - सेंट अँड्र्यू हायस्कुल , वास्को ( रक्षा साळगावकर, रक्षंदा गोसावी), तिसवाडी १ व २ - बाल भवन, पणजी (डॉ. वेदिका वाळके, सनथ भरणे), बार्देस १,२, ३, - सेंट झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा (प्राची प्रभावळकर, पुरुषोत्तम वेर्लेकर) या केंद्रावर दुपारी २ वाजता स्पर्धा सुरु होईल. केवळ तिसवाडी २ केंद्रावर २.३० वाजता सुरु होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.