Sharad Ponkshe : छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली निष्ठा आणि श्रीरामासह श्रीकृष्णाच्या संस्कारांचे मिळालेले बाळकडू, याच्या जोरावर देशावर भगवा फडकवण्याचे स्वप्न बाळगून एकही लढाई न हरलेला अद्वितीय योद्धा असलेले बाजीराव पेशवे इतिहासाच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिले. ही बाब आपणा सर्वांसाठी खेदाची असल्याचे उद्गार प्रसिद्ध अभिनेते तसेच व्याख्याते शरद पोंक्षे यांनी काढले.
फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात शनिवारी हिंदू सांस्कृतिक न्यास या संस्थेचे उद्घाटन पोंक्षे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक जयंत मिरींगकर, संस्थेचे पदाधिकारी मनोज गावकर व अजय सावईकर, संजय घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पोंक्षे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर बाजीराव पेशव्यांची प्रचंड निष्ठा होती. आईकडून त्यांना देशप्रेमाचे धडे मिळाले. शिवाजी महाराजांसह भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या चरित्रामुळे बाजीराव पेशवे घडले. त्यामुळेच एकही लढाई न हरलेले ते पेशवे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला आदर्श
बाजीराव पेशव्यांकडे प्रतिशिवाजी होण्याची क्षमता होती. पण त्यांनी शिवाजी महाराजांप्रति निष्ठा ठेवली. छत्रपतींच्या गादीची कधी लालसा ठेवली नाही. हे स्वराज्य व्हावे यासाठी अपार कष्ट घेतलेल्या शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी बाळगला आणि हिंदवी स्वराज्याची पताका दिल्ली तख्तावर फडकावी असा एकच निश्चय करताना सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी पेशवाई सांभाळली. लढाया लढण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांचा पैसा वापरला नाही, तर सावकारांकडून कर्ज घेतले आणि लढाया जिंकून ते फेडलेही.
मस्तानीमुळे बदनामी
बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंड राजाला लढाईवेळी मदत केली. त्याची परतफेड म्हणून बुंदेलखंड राजाने मुस्लिम महिलेपासून झालेली कन्या मस्तानी बाजीराव पेशव्यांना अर्पण केली. पद्धतशीरपणे त्यांचे लग्नही लावून दिले. शनिवारवाड्यावर बाजीराव पेशव्यांनी मस्तानीला ठेवले, पण घरातील कलह त्यांच्या जीवावर आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.