Calangute News : परप्रांतीय ट्रॉलर्सची दादागिरी रोखा : एलईडीद्वारे मासेमारी

कामगारांचा जीव धोक्‍यात; शापोरा बोट असोसिएशनच्‍या बैठकीत चिंता
Jetty
Jetty Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute News : कळंगुट, शापोरा मच्‍छीमार जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिक ट्रॉलर्सवर सिंधुदुर्गातील ट्रॉलर्सवाल्‍यांकडून दगडफेक करण्‍याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे ट्रॉलर्सवरील कामगारांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तसेच गोव्‍याच्‍या समुद्रात बाहेरील ट्रॉलर्सवाल्‍यांकडून एलईडीद्वारे मासेमारी करण्‍यात येत आहे. या प्रकारांना आळा घालून दोषींवर तात्‍काळ कारवाई करावी, अशी मागणी शापोरा बोट असोसिएशनच्‍या बैठकीत करण्‍यात आली.

शापोरा मच्छीमार जेटीवरील समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालल्या आहेत. तसेच ही जेटी दैनंदिन वापरासाठी धोकादायक बनल्याचे वृत्त दै. ‘गोमन्तक’मध्‍ये काल शनिवारच्या अंकात छापून आले होते.

त्‍याची दखल घेऊन शापोरा बोट असोसिएशनचे चेअरमन बलभीम मालवणकर, इतर पदाधिकारी तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांची गोवा कोस्टल पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी निरीक्षक टेरेन्स वाझ यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

१६, १७ रोजी ‘सागर कवच’ मोहीम

मच्छीमार खाते तसेच बंदर कप्‍तानच्‍या सहकार्याने शापोरा जेटीवरील मच्‍छीमारांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील. तसेच गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणाऱ्या परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई करण्‍यात येईल, असे आश्‍‍वासन सुदेश नार्वेकर यांनी दिले.

तसेच या कारवाईचा एक भाग म्हणून येत्या १६ व १७ नोव्हेंबर असे दोन दिवस ‘सागर कवच’ मोहीम हाती घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आणीबाणीच्या प्रसंगी वापरात आणण्यासाठी ‘चंद्रेश्‍‍वर’ नावाची एक बोट सध्या तटरक्षक दलाच्‍या सेवेत आहे. स्थानिक मच्छीमारांच्या तक्रारींनुसार सागरी सीमांचे उल्लंघन करणाऱ्या परप्रांतातील टॉलर्सवाल्यांवर कारवाई करण्यासाठी या बोटीचा उपयोग करण्यात येणार आहे. या बोटीसह रेस्क्यू ऑपरेशनसाठी वापरात आणल्या जाणाऱ्या तीन रिब बोटींचाही वापर करण्‍यात येईल.

- सुदेश नार्वेकर, गोवा कोस्टल पोलिस उपअधीक्षक

Jetty
Dona Paula Jetty: दोना पावला जेटीवर प्रत्येकाची ओळख पटविणे शक्य आहे का? - बाबूश मोन्सेरात

एकजुटीने लढा देण्‍याचा निर्धार

कोस्टल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सागरी सुरक्षा बोटी नादुरुस्त अवस्थेत गेले वर्षभर शिवोलीतील शापोरा नदीच्या काठावर नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. या बोटी सरकारकडून पुन्हा कोस्टल पोलिसांच्या सेवेत सामावून घेण्यासाठी संबंधित खात्यामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे कोस्टल पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी सांगितले.

स्थानिक मच्छीमारांना धोका पोहोचविण्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या बाहेरील शक्तींविरोधात गोवा कोस्टल पोलिस तसेच स्थानिक मच्छीमार एकजुटीने लढा देतील, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

गंजलेल्या शापोरा जेटीच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शापोरा बोट असोसिएशन अशाच प्रकारची बैठक लवकरच घेणार असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com