Mopa Airport: एअर इंडियामधील ‘त्या’ प्रकारानंतर मोपा विमानतळावर लज्जास्पद प्रकार

दोन परदेशी नागरिकांनी फ्लाइट अटेंडंट सोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.
Goa Mopa Airport | Goa International Airport | Manohar International Airport
Goa Mopa Airport | Goa International Airport | Manohar International AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mopa Airport : काही दिवसांपूर्वी एअर इंडिया विमानांमधील एका प्रवाशाने केलेला लज्जास्पद प्रकार समोर आल्यानंतर गोव्यातील मोपा येथे नव्याने सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशीच एक घटना समोर आली आहे. दोन परदेशी नागरिकांनी फ्लाइट अटेंडंट सोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. नवीन विमानतळ सुरू झाल्याच्या अवघ्या काही दिवसात ही घटना घडलीय.

Goa Mopa Airport | Goa International Airport | Manohar International Airport
Air India च्या विमानात मद्यधुंद व्यक्तीचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघुशंका

या बाबत सविस्तर वृत्त असे की, सीआयएसएफकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गोवा-मुंबई G8 372  फ्लाइटमध्ये दोन परदेशी पुरुष प्रवासी होते.  विमानात चढल्यापासून त्यांनी अश्लील शेरेबाजी करत फ्लाइट अटेंडंटना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांचे ते कृत्य वाढतच गेले. सदर प्रकारामुळे सहप्रवाशांनी त्याबाबत तक्रार केल्यावर त्या  दोन परदेशी नागरिकांना उतरवून सीआयएसएफ कर्मचार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले आणि एअरलाइनने तात्काळ नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (डीजीसीए) याची माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, दोन्ही ग्राहकांना ऑफलोड करण्यात आल्याचे  एअरलाइनने सांगितले.

Goa Mopa Airport | Goa International Airport | Manohar International Airport
Air India: विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला 'इतक्या' वर्षांची होणार शिक्षा

ब्रीफिंग दरम्यान, त्या  दोन परदेशी नागरिकांनी आक्षेपार्ह भाषा वापरत  क्रूला शिवीगाळ करत टिंगलटवाळी सुरू केली. क्रूने त्यांना तशी भाषा न वापरण्यास नम्रपणे कळवले. तथापि, त्यांनी आपले कृत्य सुरूच ठेवले. गो फर्स्टने एका निवेदनात म्हटले आहे की, उड्डाण अटेंडंट टेक ऑफ करण्यापूर्वी सुरक्षा ब्रीफिंग करत असताना हा प्रकार घडला.  एअरहोस्टेसने ही गोष्ट वैमानिकांपर्यंत पोहोचवल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना कळवण्यात आले आणि दोघांना विमानातून बाहेर काढण्यात आले. एअरलाइन्सचे अधिकारी आणि GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लिमिटेड (GGIAL) अधिकाऱ्यांच्या कडून  अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीय .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com