महागाई असह्य; शॅक्सवाल्यांनी गुंडाळला व्यवसाय

पर्यटन हंगाम संपण्यास महिना बाकी असतानाच अनेकांनी शॅक्स उतरविले
Shacks in Goa
Shacks in GoaDainik Gomantak

मडगाव : देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण असणारे गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेले शॅक्स खरे तर मे महिन्याच्या अखेर पर्यंत चालू असतात. मात्र यंदा वाढलेल्या महागाईत हा व्यवसाय चालविणे जिकरीचे झाल्याने आताच काही जणांनी आपले शॅक्स खाली उतरविणे सुरू केले आहे तर काही जणांनी मार्च महिन्यातच आपला गाशा गुंडाळला होता.

Shacks in Goa
प्रतापसिंग राणेंच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देणारी याचिका अखेर दाखल

समुद्र किनाऱ्यावर झोपडीवजा दुकाने थाटतात त्याला शॅक्स म्हटले जात असून त्यावर मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थामुळे पर्यटकांचे गोव्यातील ते एक आकर्षण ठरले आहे. गोव्यात पर्यटन मोसम ऑक्टोबरपासून चालू होतो. त्यावेळी थाटले जाणारे हे शॅक्स दरवर्षी 31 मे पर्यंत चालू असतात.
मात्र यावेळी हे चित्र बदलले आहे. बाणावली येथील शॅक मालक जॅक कोर्तीस यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, यंदा सुरवातीचे दोन महिने आम्ही चांगला व्यवसाय केला. मात्र रशिया युक्रेन युद्धानंतर एकदम वस्तूंचे दर वाढू लागले. गॅस सिलिंडरचे आणि चिकनचे भाव एकदम वाढल्याने आम्हाला आता हा व्यवसाय पुढे चालू ठेवणे परवडत नसल्याने आम्ही व्यवसाय गुंडाळून ठेवणेच योग्य मानले.

Shacks in Goa
गोव्यातील तरुणाचा तिलारी धबधब्यावर बुडून मृत्यू

फेब्रुवारी महिन्यात गोव्यात ज्या निवडणुका झाल्या त्याचाही विपरीत परिणाम या व्यवसायावर झाल्याचे काही शॅक व्यावसायिकांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी जी आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यावेळी शॅक्स लवकर बंद करावे लागत होते. यामुळे काही पर्यटकांनी लवकर गोवा सोडला आणि याचाही परिणाम शॅक धंद्यावर झाला असे सांगितले जाते. आणखी एका शॅक व्यावसायिकाने सांगितले, की यावेळी दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ झाले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकही आले. पण हे सर्व पर्यटकांसाठी हॉटेल्सनीच पॅकेज ठेवल्याने त्यांनी होटेलात राहणेच पसंत केले.
केळशीचे माजी सरपंच आणि शॅक व्यावसायिक एडविन बार्रेटो म्हणाले, वास्तविक यावेळी पहिल्यांदाच दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक आल्याचे चित्र दिसले तरी हे पर्यटक शॅक्सवर येणारे नव्हते. विदेशी पर्यटक हेच आमचे खरे ग्राहक असून यंदा कोविड निर्बंध आणि युद्धस्थिती यामुळे गोव्यात फारसे विदेशी पर्यटक आलेच नाहीत. त्याचा फटका आम्हाला जास्त बसला असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com