Goa Shack : शॅकसाठीचे परवाने पुन्हा लटकले ; पर्यावरण विभागाकडून यादीच नाही

परंतु दुर्दैवाने गोव्यातील शॅकमालकांना त्यांच्या शॅक्सच्या कामासाठी वाट पाहावी लागत आहे.
Shack Business
Shack Business Dainik Gomantak

Goa Shack : पणजी, बहुप्रतीक्षित शॅक वाटप सोडती प्रक्रियेला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण विभागाकडून शॅक्स वाटपाची संलग्न यादी पर्यटन विभागाला अद्याप प्राप्त झालेली नाही, अशी माहिती पर्यटन संचालकांकडून प्राप्त झाली आहे.

राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाला असून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत, परंतु दुर्दैवाने गोव्यातील शॅकमालकांना त्यांच्या शॅक्सच्या कामासाठी वाट पाहावी लागत आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारी भागात नवीन शॅक धोरणानुसार शॅक वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही.

शॅकमालक आपला शॅक व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उरलेल्या पर्यटन हंगामातून काही पैसे मिळविण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

पर्यटन विभागाचे संचालक सुनीलकुमार अंचिपाका यांच्याशी संपर्क साधला असता शॅकवाटप सोडतीची सोडत केव्हा निघणार असे विचारले असता

त्यांनी सांगितले की, पर्यावरण विभागाकडून शॅकची संलग्न यादी पर्यटन विभागाला प्राप्त झाली नाही. त्यामुळे शॅक वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

जागानिश्चितीचा मुद्दा ऐरणीवर

किनाऱ्यावर कुठे शॅक घालायचे या जागेची निश्चिती कोणी करायची हा महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला आहे.

पर्यटन खाते आजवर शॅकसाठी जागा वाटप करत होते. यंदा गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने शॅकचा आकार, जागा आणि दोन शॅकमधील अंतर निश्चित केले आहे.

यामुळे एका गावातील किंवा एका वाड्यावरील शॅक अर्जदारांना शॅक घालण्यासाठी इतरत्र जाण्याची वेळ आली आहे. शॅक धारण क्षमतेचा अभ्यास केल्यामुळे आम्हीच जागा निश्चित करणार अशी भूमिका पर्यावरण खात्याने घेतली आहे.

Shack Business
Goa Accident: ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; बोर्डेत अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच अंत

किनाऱ्याची मालकी पर्यटन खात्याकडे असल्याने जागा वाटप आम्हीच करणार असे पर्यटन खात्याचे म्हणणे आहे. या वादात शॅक परवाना वाटप आणखी लटकण्याची चिन्हे आहेत.

शॅकवाटप प्रकरणाचा पर्यटन विभागाकडे शॅकमालक सतत पाठपुरावा करत आहेत. कळंगुटमधील शॅक वाटपाशी संबंधित काही समस्या आहेत,

ज्यामध्ये दोन प्रभागांमध्ये शॅक वाटपाची संख्या भिन्न असल्याचे आम्हाला समजले. पर्यटन विभागाला शॅक वाटपाची योग्य जोड यादी अद्याप मिळालेली नाही.

- क्रुझ कार्दोझ, अध्यक्ष, गोवा शॅक ओनर्स असोसिएशन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com