Sexual Assault Awareness : राष्ट्रीय फॉरेन्सिक महाविद्यालयात ; लैंगिक अत्याचार प्रतिबंध कार्यशाळेचे मार्गदर्शन

Sexual Assault Awareness : आपल्या बाजूला जरी कुठे अन्याय होत असला तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता तयार व्हायला हवी.
Sexual Assault Awareness
Sexual Assault AwarenessDainik Gomantak
Published on
Updated on

Sexual Assault Awareness : फोंडा, लैंगिक अत्याचार प्रकरणी जागरूकता आणि अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी उपयुक्त तपास यासंबंधीची महत्त्वपूर्ण कार्यशाळा कुर्टी येथील राष्ट्रीय फॉरेन्सिक महाविद्यालयात बुधवारी झाली. पोलिस, न्यायालय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या कार्यशाळेत भाग घेतला.

उद्‍घाटन समारंभाला पोलिस उपमहासंचालक अस्लम खान तसेच पीटर बोर्जेस, अरुणकुमार मिश्रा, डॉ. रॉबर्ट ग्रीन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोकेश चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.

अस्लम खान म्हणाल्या की, आजच्या घडीला प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. आपल्या बाजूला जरी कुठे अन्याय होत असला तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता तयार व्हायला हवी. बऱ्याचदा आपल्या समोर एखादा गुन्हा होतो, पण आपण त्रयस्थाप्रमाणे त्याकडे पाहूनही काणाडोळा करतो.

अत्याचारात बळी पडलेली एखादी व्यक्ती आपले कुटुंबीय असेल तर मग असेच आपण गप्प राहणार काय, असा प्रश्‍न करून पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी तत्पर आहेतच पण नागरिकांनीही जागे व्हायला हवे, असे त्या म्हणाल्या.

Sexual Assault Awareness
Goa Illegal Sand Extraction: राज्यातील बेकायदा रेती उपसाबाबत पोलिसांची न्यायालयाकडून खरडपट्टी

अरुणकुमार मिश्रा म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गुन्ह्यामुळे एखाद्याचे घर उद्ध्वस्त होऊ शकते, त्यासाठी सजग रहा असे आवाहन त्यांनी केले. लैंगिक अत्याचाराची देशभरातील आकडेवारी मिश्रा यांनी सादर केली.

डॉ. रॉबर्ट ग्रीन यांनीही आपले विचार व्यक्त करताना अशा गुन्ह्यांचा तपास करताना त्यासंबंधीच्या तपासासाठी डीएनए तसेच इतर घटकांचा पूर्ण तपास करायला हवा, तरच गुन्हेगारांना शिक्षा मिळू शकते असे सांगितले. कार्यशाळेत मौलिक विचारांचे आदानप्रदान करण्याबरोबरच गुन्ह्यांच्या तपासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला हवे असे नमूद करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. लोकेश चौहान यांनी केले. रमणकुमार यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com