Sudin Dhavalikar : कवळेत साकारतोय मलनि:स्सारण प्रकल्प; सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्‍वरूपी तोडगा

६६,८०० जणांना लाभ; सरकारसह मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नागरिकांकडून अभिनंदन
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Sudin Dhavalikar : कवळे पंचायत क्षेत्रात होऊ घातलेला मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प प्रदीर्घ अशा सहा वर्षांच्या कालखंडानंतर साकार होत आहे. या प्रकल्पामुळे सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्‍वरूपी तोडगा निघणार असल्याने कुर्टी, कपिलेश्वरी, कवळे, वेळप, ढवळी आदी भागातील नागरिकांनी आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आभार मानले आहेत.

Sudin Dhavalikar
Goa Traffic Violations : बेदरकार वाहन चालकांवर कारवाई व्हायलाच हवी; खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची मागणी

या प्रकल्पाचे काम तीन टप्‍प्यांत हाती घेण्यात आले होते. पहिला टप्पा कुर्टी, दुसरा कवळे पंचायत व फोंडा तर तिसरा टप्पा बांदोडा पंचायत क्षेत्रात आहे. या प्रकल्पांवर सुमारे ५३५ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. एकूण ६६,८०० नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. त्यामुळे विकासाच्या क्षेत्रात सरकार व ढवळीकर यांच्या कार्यासाठी हा मैलाचा दगड ठरला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे लाभले मौलिक सहकार्य

  • अद्ययावत यंत्रणा वापरून, जैविक प्रक्रियेतून तसेच उच्च दर्जाच्या पाईप्‍सचा वापर करुन हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. सांडपाण्याचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यात असलेले अजैविक व न विरघळणारे प्लास्‍टिक बाजूला काढून त्यावर क्लोरिन घालून पाण्याच्या शुद्धतेच्या प्रक्रियेला सुरवात केली जाते. त्या शुद्ध पाण्याचा वापर बागा व उद्यानांसाठी केला जातो.

  • येथील काही शेतकरी तसेच मलनि:स्सारण मंडळाचे माजी व्यवस्थापक संचालक अरविंद पाटील, पद्मनाभ शेल्डारकर, दिलीप ढवळीकर, उमेश कुलकर्णी व अरविंद करमाडी, कवळेचे तत्कालीन सरपंच राजेश कवळेकर, विद्यमान सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व पंचायत मंडळ यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभा राहिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com