Quepem: केपेतील आरोग्य केंद्र परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य; नागरिकांचा नाक मुठीत धरून प्रवास

Quepem Primary Health Centre: बोरीमळ-केपे येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या गटारातून गेल्या कित्येक महिन्यांपासून घाण पाणी वाहत असून हे पाणी कुठून येते, याचा कुणीच शोध घेत नसल्याने सध्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे.
Quepem Primary Health Centre
Quepem Primary Health Centre unsanitary ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

Sewage Overflow Near Kepe Primary Health Center Leads to Health Concerns

केपे: केपे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गटारातून घाणीचे पाणी वाहत असल्याने याठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. असह्य दुर्गंधीमुळे लोकांना नाक मुठीत धरून जावे लागते. शिवाय या पाण्याचा निचरा शेतजमिनीत होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे.

बोरीमळ-केपे येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या गटारातून गेल्या कित्येक महिन्यांपासून घाण पाणी वाहत असून हे पाणी कुठून येते, याचा कुणीच शोध घेत नसल्याने सध्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे.

या रस्त्याशेजारी काही लोक व्यवसाय करीत असून घाणीचा वास येत असल्याने लोक याठिकाणी खरेदी करण्यास टाळतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. याविषयी संबंधित खात्याकडे तक्रार दाखल करूनही कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Quepem Primary Health Centre
Calangute Police: मद्यधुंद पर्यटकाला मारहाण भोवली; Video Viral झाल्याने पोलीस हवालदाराची नोकरी धोक्यात

केपेत अनेक ठिकाणी घाणीच्या पाण्याचा निचरा होत असल्याने अनेक वर्षांपासून लोकांना त्रास होत आहे; पण याविरोधात संबंधित खात्याचे अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com