Serial Killer Mahanand Naik: सिरियल किलर महानंदची सुटकेसाठी हायकोर्टात धाव; अर्जावर 4 डिसेंबरला फैसला

Goa Bench Of Bombay High Court: सिरियल किलर महानंद नाईक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे.
Serial Killer Mahanand Naik: राज्यात खळबळ माजवणाऱ्या सिरियल किलर महानंदची हायकोर्टात धाव; शिक्षामुक्तीच्या अर्जावर 4 डिसेंबरला फैसला!
High Court of Bombay at GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात खळबळ माजविलेला दुपट्टा सिरियल किलर महानंद नाईक याने शिक्षापूर्व सुटकेसाठी केलेला अर्ज शिक्षा फेरआढावा समितीने फेटाळल्याने त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठाने सरकारच्या या समितीला नोटीस बजावून पुढील सुनावणी ४ डिसेंबरला ठेवली आहे.

महानंदविरुद्ध दाखल झालेल्या १६ खुनांपैकी तीन प्रकरणांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर एका बलात्कारप्रकरणी शिक्षा झाली होती. बलात्कारप्रकरणी झालेली शिक्षा भोगून पूर्ण झाली आहे, तर एका खून प्रकरणात त्याने आव्हान दिलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविले आहे.

Serial Killer Mahanand Naik: राज्यात खळबळ माजवणाऱ्या सिरियल किलर महानंदची हायकोर्टात धाव; शिक्षामुक्तीच्या अर्जावर 4 डिसेंबरला फैसला!
Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

न्यायालयाने निर्दोष ठरविण्यापूर्वी त्याने शिक्षापूर्व सुटकेसाठी अर्ज केला होता. त्याला समितीने मान्यता दिली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. तो शिक्षा भोगत असलेल्या दोन खून प्रकरणांपैकी एका प्रकरणात त्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिक्षेची मुदत त्याला अटक (Arrested) झाल्यापासून धरून त्याची शिक्षापूर्व सुटका करावी, अशी विनंती त्याने समितीकडे केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com