Goa Crime: 'त्यांना' जन्मठेप नको फाशी द्या! 'सीरियल किलींग' प्रकरणात पोलिसांची मागणी; न्‍यायालयाकडून नोटीस जारी

Goa serial killer case: २००९ मध्ये आरोपी चंद्रकांत व सायरॉन तसेच ग्रिस्मा या तिघांनी गोव्यात तीन तरुणी व एका अल्पवयीन मुलीला गाडीमध्ये लिफ्ट देत त्यांची हत्या करण्याचे तीन वेगवेगळे गुन्हे केले होते.
Goa Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील तीन तरुणी व एका अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी सीरियल किलर चंद्रकांत तलवार व सायरॉन रॉड्रिग्स या दोघांना जन्मठेपऐवजी फाशीची तर तलवार याची पत्नी ग्रिस्मा हिची निर्दोष मुक्तता रद्द करून शिक्षा देण्याची याचिका पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सरकारतर्फे दाखल केली आहे. त्यावर आज प्राथमिक सुनावणी होऊन दोघाही आरोपींना तसेच ग्रिस्मा हिला नोटीस बजावून सुनावणी पुढील आठवड्यात खंडपीठाने ठेवली आहे.

गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये गोवा बालन्यायालयाने ताळगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी चंद्रकांत तलवार व सायरॉन रॉड्रिग्स याना जन्मठेपेची तर आरोपी ग्रिस्मा तलवार हिला पुराव्यांअभावी निर्दोषमुक्त ठरवले होते. बालन्यायालयाच्या या शिक्षेला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच ग्रिस्मा तलवार हिची निर्दोष मुक्तता रद्द करून तिला दोषी ठरवून शिक्षा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या आव्हान याचिकेवर आज पहिल्यांदाच सुनावणी होऊन आरोपींना तसेच ग्रिस्मा तलवार याना खंडपीठाने नोटीस बजावली आहे. २००९ मध्ये आरोपी चंद्रकांत व सायरॉन तसेच ग्रिस्मा या तिघांनी गोव्यात तीन तरुणी व एका अल्पवयीन मुलीला गाडीमध्ये लिफ्ट देत त्यांची हत्या करण्याचे तीन वेगवेगळे गुन्हे केले होते.

Goa Crime News
Cyber Crime: सायबर गुन्ह्यांद्वारे देशात 25 हजार कोटी रुपयांची फसवणूक; गोवा पोलिस महासंचालकांनी दिली धक्कादायक माहिती

असा केला जायचा ‘गेम’

रस्त्याच्या ठिकाणी प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या एकट्या महिलेला हेरून आरोपी गाडीत लिफ्ट द्यायचे. गाडीत तलवार याची पत्नी ग्रिस्मा असल्याने महिलांना संशय येत नसे. गाडीतून जातानाच चालकाच्या बाजूला बसलेल्या महिलेचा मागील आसनावर बसलेल्या आरोपीकडून गळा आवळून खून केला जायचा. त्यानंतर तिचे दागिने व पैसे लंपास करून मृतदेह रॉकेलने जाळून त्याची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट केला जायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com