Serendipity Arts Festival: ‘सेरेंडिपिटी’चे नेटके नियोजन; सरकारकडून मात्र ‘असहकार’

Serendipity Arts Festival 2024: ‘सेरेंडिपीटीने नऊ वर्षांत आपली वेगळी ओळख आणि वलय निर्माण केले आहे. या महोत्सवासाठी वर्षोनुवर्षे भेट देणाऱ्यांची किंवा हा महोत्सव अनुभवणाऱ्यांची संख्या आठवडाभरात काही लाखांच्या घरात पोहोचली आहे.
Serendipity Arts Festival 2024 25
Serendipity Arts Festival 2024 25Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘सेरेंडिपीटीने नऊ वर्षांत आपली वेगळी ओळख आणि वलय निर्माण केले आहे. या महोत्सवासाठी वर्षोनुवर्षे भेट देणाऱ्यांची किंवा हा महोत्सव अनुभवणाऱ्यांची संख्या आठवडाभरात काही लाखांच्या घरात पोहोचली आहे. गर्दी खेचणाऱ्या कार्यक्रमाचे ठिकाण आयोजकांनी नागाळी येथे नेले, पण अशा महोत्सवासाठी सरकारकडून मान्यता देण्यापलिकडे काहीही सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले.

सरकारचे सहकार्य मिळत नाही, असे म्हणण्यामागे कारण म्हणजे नागाळी येथील कार्यक्रमांना मागील काही वर्षांपासून किमान दहा ते पंधरा हजारांच्यावर प्रेक्षक उपस्थिती लावत आहे. याठिकाणी २० रोजी सलीम-सुलेमान मर्चंट या प्रख्यात कलाकारांचा कार्यक्रम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश मुफ्त असल्याने या कार्यक्रमाला पंधरा हजारांवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला आलेल्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागाच मिळाली नाही. अनेकजणांना दोना पावला चौकाच्या परिसरात वाहन पार्किंग करून साधारण तीन किलोमीटर चालत कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे लागले होते.

विशेष बाब म्हणजे उषा उथ्थप, अरुणा साईराम आणि शुभा मुग्दल यांच्या अतुलनीय कलागुणांना साजरी करणारी मैफल तीन दिवसांची एक मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ प्रेक्षकांना अनुभवता आली. तीन दिग्गज आवाज एकत्र आणणारा कार्यक्रम अनेकांना संस्मरणीय ठरलाही असेल. परंतु अशा प्रख्यात कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी येणाऱ्यांची वाढणारी गर्दी पाहता सरकारला आता नियोजनासाठी सहकार्य करावे लागणार आहे.

Serendipity Arts Festival 2024 25
Suleman Khan Video: सुलेमान पलटला; म्हणाला, पालेकरांच्या सांगण्यावरून पोलिसांवर आरोप

महोत्सवासाठी ५ हजार पर्यटक

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी शहर महोत्सवासाठी जगाच्या नकाशावर यावे यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानंतर खासगी क्षेत्रातील ‘सेरेंडिपीटी‘ हा कला महोत्सव आयोजित करून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आणण्याचे पाऊल उचलले होते. सध्या या कार्यक्रमाला खास करून विविध देशातून किमान चार ते पाच हजार पर्यटक येतात.

Serendipity Arts Festival 2024 25
Goa Politics: ..'मंत्रिमंडळ फेरबदल' आताच होणार असे नाही! तानावडेंच्या प्रतिक्रीयेमुळे चर्चांना पूर्णविराम

स्मार्ट सिटीत खोदकाम, तरीही कार्यक्रम

पणजी शहरात एका बाजूला स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. असे असताना सेरेंडिपिटीच्या कार्यक्रमांना महानगरपालिकेने परवानगी दिली. त्याचा परिणाम कार्यक्रमासाठी आलेल्यांच्या वाहनांच्या पार्किंगचे प्रश्न उद्‍भवत होता. त्याशिवाय महात्मा गांधी रस्ता आणि १८ जून रस्त्यावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत होता. ‘सेरेंडिपिटी‘ महोत्सवामुळे पणजीला एक कलात्मक कार्यक्रमाची देणगी लाभली आहे, वाहतुकीचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न असतानाही हा कार्यक्रम आयोजकांनी पार पाडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com