Senior Journalist Rosario Mascarenhas Dies After Falling Into Septic Tank in Saligao
Senior Journalist Rosario Mascarenhas Dainik Gomantak

Goa News: धक्कादायक! साळगाव येथे सेप्टिक टँकमध्ये पडून वरिष्ठ पत्रकाराचा मृत्यू

Tragic Death: सेप्टिक टँकचे झाकण खराब झाल्याने त्याठिकाणी दगड ठेवण्यात आला होता. नकळतपणे म्हसकॅरेन्स टाकीत पडले असावत असा अंदाज बांधला जात आहे.
Published on

साळगाव: सेप्टिक टँकमध्ये पडून वरिष्ठ पत्रकाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेलाविस्टा वाडा, साळगाव येथे बुधवारी (२८ मे) सकाळी ही घटना घडली. रोसारिओ म्हसकॅरेन्स (५७) असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसकॅरेन्स त्यांच्या घराजवळ फेरफटका मारत होते. दरम्यान, सेप्टिक टँकचे झाकण खराब झाल्याने त्याठिकाणी दगड ठेवण्यात आला होता. नकळतपणे म्हसकॅरेन्स टाकीत पडले असावत असा अंदाज बांधला जात आहे. यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Senior Journalist Rosario Mascarenhas Dies After Falling Into Septic Tank in Saligao
INSV Tarini: 4 खंड, 3 महासागर, 3 ग्रेट केप्स आणि 25,400 नॉटीकल मीलचा प्रवास; 8 महिन्यांनतंर तारिणीच्या रणरागिणी गोव्यात दाखल होणार

पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकारी सनी फायदे, फायर फायटर रामा नाईक, प्रितेश महालदार, जितेंद्र बाली, विराज खांदोळकर आणि साईराज मांद्रेकर यांच्यासग चालक साईश चारी यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली. दरम्यान, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी म्हसकॅरेन्स यांचा मृतदेह टाकीतून बाहेर काढत पर्वरी पोलिसांच्या ताब्यात दिला. म्हसकॅरेन्स यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com