Goa: 'सेकंड इनिंग्ज' ज्येष्ठ नागरिक केंद्राचा डिचोलीत वर्धापनदिन

डिचोली लायन्स क्लबच्या (Lions Club) सहकार्याने हा सोहळा साजरा कारण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त रमाकांत शेट्ये आणि सेवा केंद्राचे कार्यवाह देवू पळ यांनी दिली.
Second Innings Senior Citizens Center
Second Innings Senior Citizens CenterDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: येथील बाबा सावईकर सेवा प्रतिष्ठान संचलित 'सेकंड इनिंग्ज' ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचा तेरावा वर्धापनदिन येत्या शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. डिचोली लायन्स क्लबच्या (Lions Club) सहकार्याने हा सोहळा साजरा कारण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त रमाकांत शेट्ये आणि सेवा केंद्राचे कार्यवाह देवू पळ यांनी दिली. यावेळी विजय तेलंग आणि व्यंकटेश नाटेकर उपस्थित होते.

Second Innings Senior Citizens Center
Goa: जीवरक्षक मेलविन डिसौझांनी कंपनी अधिकाऱ्याच्या सतावणूकीतून केली आत्महत्या

कलाकारांचा सत्कार

शेट्ये प्राईड सभागृहात सायंकाळी 5 वा. होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर तर खास पाहूणे म्हणून नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात रामा महादेव गावस (कलाकार), विश्वनाथ शिवा पळ (भजनी कलाकार) आणि अर्जुन शंकर फडते या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. शेट्ये आणि पळ यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mahaaghadi Latest News
Bicholim Broiler Chicken Price Hike
Goa Bhandari Community Politics
Scheduled Tribes Of Goa Demand
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com