Free Treatment On Varicose Veins at GMC: 'व्हेरीकोज व्हेन्स'वर ‘गोमेकॉ’त मोफत उपचार

Free Treatment On Varicose veins at GMC: गोव्यात या आजाराचे सुमारे २० ते २५ टक्के प्रमाण असल्याचे ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.
Varicose Veins
Varicose VeinsDainik Gomantak
Published on
Updated on

अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसावर (व्हेरीकोज व्हेन) एंडोव्हेनस लेसर उपचार (ईव्हीएलटी) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ‘गोमेकॉ’ त मोफत उपचार सुरू झाले आहेत. आतापर्यंत २४ रुग्णांवर उपचार यशस्वी झाले आहेत.

ही लेसर उपचारपद्धती असल्याने कोणताही त्रास होत नाही व एका तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे त्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला. जास्त वेळ उभे राहून काम करणाऱ्यांना हा आजार होतो. गोव्यात या आजाराचे सुमारे २० ते २५ टक्के प्रमाण असल्याचे ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. यावेळी या विभागाचे डॉ. पवनकुमार उपस्थित होते.

‘व्हेरीकोज व्हेन’ हा आजार बस वाहक, शिक्षक, शेफ, सर्जन्स, म्युझिशियन तसेच उभे राहून काम करणाऱ्या मध्यमवर्गींयात आढळतो. रक्ताचे नियमित अभिसरण होत नसल्यामुळे नसा काळ्या पडून गाठी होऊन त्रास सुरू होतो.

पूर्वी शस्त्रक्रियेद्वारे उपचारांमुळे रुग्णांना त्रास होत होता. मात्र लेसर उपचार झटपट होतात. व्हेनला २ मिमीचे छिद्र करून लेजरद्वारे फायबर आत घुसवले जाते. रुग्ण दुसऱ्या दिवशी कामावर जाऊ शकतो, असे बांदेकर म्हणाले.

Varicose Veins
Banastarim Accident Goa: बाणस्तारी अपघाताचा 10 महिन्यांनंतर तपास पूर्ण, तिघांवर आरोप निश्‍चित

राज्यात आजाराचे २५ टक्के प्रमाण

‘व्हेरीकोज व्हेन’वर किमान एक लाख इतका खासगी इस्पितळात खर्च येतो. ‘गोमेकॉ’त उपचार मोफत करण्यात येत असून सरकारला त्यावर सरासरी सुमारे ७० हजार इतका खर्च येतो.

फायबर खरेदीचा खर्च जास्त आहे. ४ दिवसांत २४ रुग्णांवर उपचार झाले असून सुमारे २० लाख खर्चले आहेत. एंडोव्हेनस लेसर ऍब्लेशन थेरपी द्वारे प्रतिदिन १० रुग्णांवर उपचार होऊ शकतात. रूग्णांनी इंटरव्हेनशनल रेडिओलॉजी विभागाला भेट द्यावी,असे आवाहन बांदेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com