दवर्लीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद होण्याची शक्यता, उप-जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक

Chhatrapati Shivaji Maharaj: सायंकाळी चार वाजता मडगावातील मथानी साल्ढाणा इमारतीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दवर्लीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद होण्याची शक्यता, उप-जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक
छत्रपती संभाजी महाराजDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रुमडामळ दवर्लीत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दवर्ली पंचायत परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आज (०८ ऑगस्ट) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी गणेश बर्वे यांनी याबाबत नोटीस जारी केलीय.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, सासष्टी तालुक्याचे मामलेदार, मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक, श्री मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि सदस्य, रुमडामळ दवर्ली गावचे रहिवासी विनायक वळवईकर, मंतेश पारवार, सर्वेश पेडणेकर आणि भगवान रेडकर यांना ही नोटी पाठविण्यात आलीय.

दक्षिण उपजिल्हाधिकारी बर्वे यांच्यावतीने आज (०८ ऑगस्ट) सायंकाळी चार वाजता मडगावातील मथानी साल्ढाणा इमारतीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. श्री मारुती मंदिर ट्रस्ट, दवर्ली यांच्यावतीने दावा केलेल्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

यावरुन दवर्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Meeting Notice
Meeting NoticeDainik Gomantak
दवर्लीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद होण्याची शक्यता, उप-जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक
Goa University: गोवा विद्यापीठाच्‍या चुकीमुळे हुकला पदवी प्रवेश, अनेक विद्यार्थ्यांना त्रास; आलेमाव यांच्याकडून दखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन यापूर्वी झालेले वाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी वाद झाल्याच्या घटना घडल्या संभाजी आहेत. एक वर्षापूर्वी कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्यावरुन मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पुतळा हटविण्याच्या पंचायतीच्या आदेशानंतर या भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते.

त्यानंतर, दक्षिणेतील सा जुझे दी आरियाल येथे शिवजयंतीच्या वेळेला उभारण्यात आलेल्या पुतळ्यावरुन तणापूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय, आके म्हापसा येथे देखील वाद झाला होता. फादर बोलमॅक्स परेरा यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com