CM Pramod Sawant: केंद्राकडून अधिसूचना आल्‍यानंतर जुनी खासगी वाहने स्‍क्रॅप : सावंत

CM Pramod Sawant: जुन्‍या आणि 15 वर्षांचा टप्पा ओलांडलेली खासगी वाहने स्क्रॅप करण्याची अधिसूचना अजूनही केंद्र सरकारकडून आलेली नाही.
Vehicle Scrap
Vehicle ScrapDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: जुन्‍या आणि 15 वर्षांचा टप्पा ओलांडलेली खासगी वाहने स्क्रॅप करण्याची अधिसूचना अजूनही केंद्र सरकारकडून आलेली नाही. त्यामुळे लोक अशा वाहनांचे वार्षिक नोंदणी नूतनीकरण करून ते चालवू शकतात.

Vehicle Scrap
Dog Vaccination In Goa: पाळीव कुत्र्यांच्या लसीकरणाला अल्‍प प्रतिसाद

केंद्राकडून जुनी वाहने स्क्रॅप कण्याची अधिसूचना आल्यानंतरच मात्र खासगी वाहनांची विल्हेवाट लावली जाईल, असे गोवा वाहतूक विभागाचे

साहाय्यक संचालक बी. ए. सावंत यांनी सांगितले.

गोव्यात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 15 वर्षांवरील सरकारी वाहने यापूर्वीच स्‍क्रॅप करण्यात आलेली आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. राज्यात कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनांच्या घनतेच्या बाबतीत गोवा हे जागतिक स्तरावर 15 व्या क्रमांक आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

बी. ए. सावंत म्‍हणाले की, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनंतर 15 वर्षांवरील सर्व शासकीय वाहनांची नोंदणी नूतनीकरण करता येत नसल्याने ती रद्द करण्यात आलेली आहेत. या सरकारी वाहनांच्या जागी नवीन वाहने येणार आहेत. केंद्राकडून अधिसूचना आल्‍यावर 15 वर्षांवरील खासगी वाहने भंगारात काढली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod swant
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com