..त्यांना सांभाळा! बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार व समाजाचा एकत्र प्रयत्न आवश्‍यक; कारवाईपेक्षा मानसिकता जाणून घ्या

Juvenile Crime: विदेशात ज्याप्रकारे मुले बालगुन्हेगारीकडे वळतात त्यांना तज्ज्ञांमार्फत समुपदेशन दिले जाते त्याच धर्तीवर राज्यात ही कृती अमलात आणणे गरजेचे
juvenile crime
juvenile crimeBM
Published on
Updated on

म्हापसा : शाळा सोडल्याचा दाखला देण्यास उशीर केल्याच्या राग मनात बाळगून आधी हडफडे येथील सेंट जोजफ हायस्कूलमधील २.५ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, तसेच केवळ मौजमस्ती म्हणून धुळेर येथील सेंट अँथनी हायस्कूलच्या मालमत्तेची नासधूस व जाळपोळ करण्याचे कृत्य सहाजणांच्या किशोरवयीन टोळक्याने केला. या मुलांना हणजूण पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांपैकी पाचजण हे सेंट जोजफ हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. न्यायालयाने या मुलांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा बालगुन्हेगारी वाढतेय अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र बालगुन्हेगारी वाढते असे म्हणण्यापेक्षा त्यामागची प्रत्यक्ष कारणे शोधून उपाययोजना राबविणे काळाची गरज बनली आहे. अशा मुलांना कठोर शिक्षा देण्याऐवजी त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन देण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण बालगुन्हेगारीचा शिक्का नंतर मुलांना आपसूकच गुन्हेगारी जगताची कवाडे उघडी करतो. गुन्हेगारीचे हे पहिले पाऊल समाजाने व सरकारने एकत्रितपणे वेळीच थोपविले पाहिजे.

यासंदर्भात वैज्ञानिक डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितले की, शाळांमध्ये तोडफोड व जाळपोळ करण्यापर्यंत या मुलांचे धाडस झाले. परंतु, या मुलांच्या कृतीमागे नेमका हेतू पोलिसांनी शोधावा. हा त्यांचा पहिलाच गुन्हा आहे का, हे तपासावे.

कुठल्या कारणास्तव त्यांनी हे चुकीचे पाऊल उचलले. ही सर्व मुले किशोर वयातील आहेत. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन देण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रकारे विदेशात जी मुले बालगुन्हेगारीकडे वळतात, त्यांना सुधारणा घरात ठेवून तज्ज्ञांमार्फत समुपदेशन दिले जाते. त्याच धर्तीवर राज्यात ही कृती अमलात आणणे गरजेचे. अन्यथा मुलांचे हे धाडस त्यांना चुकीच्या मार्गी घेउन जाऊ शकते.

बालगुन्हेगारीसाठी पालक-शिक्षक, सामाजिक संस्था, समाजकल्याण, पोलिस व इतर विभागांनी घटकस्तरावर जागृतीसाठी प्रयत्न करावेत. बालगुन्हेगारांची वाढती संख्या भविष्यात ज्वालामुखी ठरु शकते. मुले समाजविघातक अपराध का करत आहेत, किंवा त्यांना कायद्याची भीती वाटत नाही का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक असल्याचे कामत म्हणाले.

बालगुन्हेगारीवर चर्चा व्हावी

या मुलांचा पहिला गुन्हा असेल तर सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये. त्याऐवजी या मुलांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी, त्यांची मानसिकता जाणून घ्यावी. तसेच मानसशास्त्राच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या मुलांना भेटून त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, असे कामत म्हणाले. तसेच सरकारने व माध्यमांनी देखील गुळगुळीत झालेले विषय घेऊन चर्चा करण्याऐवजी आता अशाप्रकारचे बालगुन्हेगारीवर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे तज्ज्ञांना वाटते.

juvenile crime
Goa Crime: शाळांमध्ये चोरी, मालमत्तेची नासधूस व जाळपोळ केल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक; चोरलेला मुद्देमाल जप्त

कौटुंबिक स्तरापासून प्रयत्न आवश्‍यक

अल्पवयीन मुले वा किशोरवयीन मुले गंभीर गुन्ह्यांकडे वळत असल्याचे दर्शविणाऱ्या या घटनांकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहत येत नाही. तर समाजात फोफावणारी ही विषवल्ली रोखण्यासाठी कुटुंबाच्या स्तरापासून प्रयत्न करणे गरजेचे. मुलांकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नसतो. मुलांना सहज बऱ्याच गोष्टी उपलब्ध असणे याचा परिणाम म्हणून मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे.

किशोरवयीन मुलांना दुचाकी किंवा वाहने सोपविण्याचा आततायीपणा पालकांनी टाळावा. मुलांचे मित्र बनून चांगल्या-वाईटाची जाणीव त्यांना करून द्यावी. मुलांचे वर्तन बदलले तर पालकांनी त्याबाबत खबरदारी घ्यावी.

बालगुन्हेगारी हा सामाजिक प्रश्न आहे, परंतु तो सोईस्कररीत्या पोलिसांकडे सरकविण्यात आला आहे. मुलांमध्ये वाढणारी हिंसा, उद्धटपणा व गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात महत्त्वाची जबाबदारी पालकांची असते. आपल्या पातळीवर प्रयत्न करून मुलांच्या वागण्यात बदल होत नसल्यास समुपदेशन हाच एकमेव उपाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com