Power Cut In Goa: 29 एप्रिल ते 4 मे नावेली, मांडोपा, फोंडा आणि दवर्लीत वीज पुरवठा खंडित होणार; असंय नियोजन

Planned Power Shutdown In Goa: नावेली, मांडोपा, फोंडा आणि दवर्लीत येथील विविध भागात चार तास वीज पुरवठा खंडित केला जाईल.
Goa Power Shutdown
Goa Power ShutdownDainik Gomantak

Power Shutdown In Goa

गोवा वीज खात्याच्या वतीने राज्यातील विविध भागात दुरुस्ती काम नियोजित असल्याने वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. यात नावेली, मांडोपा, फोंडा आणि दवर्लीत येथील विविध भागात चार तास वीज पुरवठा खंडित केला जाईल.

29 एप्रिल ते 4 मे या काळात हे दुरुस्ती काम नियोजित आहे. कोणत्या भागात केव्हा वीज पुरवठा खंडित असेल याची सविस्तर माहिती घेऊयात.

नावेली येथे 29 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान नावेलीतील काही भागांत वीज पुरवठा खंडित असणार. येथील 11 केव्ही फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने वीज पुरवठा बंद असेल.

तसेच, मांडोपा येथे 11 केव्ही मांडोपा फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान मंडोपा चार रस्ता, मंडोपा मैदान, मोडी, शनी मंदिर, ब्लास्को हॉल, मोदभाट, पाद्रे पियो, धर्मापूर, फ्रेडले, बेले, क्रुझनगर, रेवोडा, कालवाड्डो, आणि मंडोपा ब्रिज परिसर भागात वीज पुरवठा खंडित असेल.

दोन मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 नावेलीत 11 केव्ही फिडरच्या दुरुस्ती कामानिमित्ताने आके-बायक्सो भागात, डोंगरी शिरोडकर, पोसरो परिसर जवळ आणि शांतीनगर परिसर भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Goa Power Shutdown
ISL Semifinal: एफसी गोवाला झटका, आयएसएलच्या उपांत्य लढतीत मुंबई सिटीचा रोमहर्षक विजय

तसेच, फोंडा येथे 3 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान मुख्य गेटजवळील परिसर, शेणवी शाळा, घंटामरड, फुसलाभाट, फातिमा चर्च, डिकारपाली, चावड्डो व बोगदेवड्डो भागात वीजपुरवठा बंद असेल.

दवर्ली येथे 4 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान लयमती, तळेबांद, इंडोना, दत्तमंदिर परिसर, संपूर्ण दवर्ली पंचायत भागात, वेस्ट कोस्ट, बागा, झोरीवाड्डो, पुंडलिकनगर, वासुदेव नगर आणि रूमडामळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com