SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Mumbai Crime News: २५ जुलै रोजी त्या माघारी येत असताना सकाळी नऊच्या सुमारास त्यांची कार चोरी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
SBI manager Mumbai home robbery
TharMahindra Website
Published on
Updated on

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ मॅनेजर गोव्यात कामासाठी गेल्या असता त्यांच्या मुंबईतील घरात चोरी झाली. महिलेच्या वडाळा येथील घरातून लाखो रुपयांची थार कार चोरी झाली. याप्रकरणी माटुंगा पोलिस स्थानकात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तृप्ती नंदलाल सुमानी (४६) या महिलेने या प्रकरणी चोरीची तक्रार दाखल केली आहे. तृप्ती यांची पणजी, गोवा येथे मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली आहे. मूळ मुंबईत शिवडी – वडाळा रोड येथे त्या वास्तव्यास आहेत.१५ ते २५ जुलै २०२५ दरम्यान, ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

SBI manager Mumbai home robbery
Goa Third District: नवा तिसरा जिल्हा आणि मुख्यालय; काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार का मानले? काँग्रेस आमदाराचा सवाल

तृप्ती सुमानी यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी काळ्या रंगाची थार खरेदी केली होती.  शिवडी – वडाळा रोड येथील घराजवळ त्या कार पार्क करायच्या. ०७ जुलै २०२५ त्या गोव्याला जात असताना त्यांच्या सहकाऱ्याकडे गाडीची जबाबदारी सोपवली होती. आठवड्यातून एकदा कार स्वच्छ करण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर सोपविण्यात आली होती. 

२५ जुलै रोजी त्या माघारी येत असताना सकाळी नऊच्या सुमारास त्यांची कार चोरी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तक्रारदार सुमानी यांनी आसपासच्या परिसरात कारचा शोध घेतला पण त्यांना कार सापडली नाही. यानंतर याबाबत चोरीची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com