Savoi Verem : सिद्धा क्लबतर्फे कुंडईतील गरजू महिलेला आर्थिक मदतीचा हात

Savoi Verem : क्लबचे अध्यक्ष ॲड. विरेश रिवणकर म्हणाले, की स्पर्धांच्या आयोजनातून मिळालेल्या फायद्याची रक्कम मोठमोठ्या पार्ट्या करण्यातच विनाकारण वाया घालवली जाते.
Savoi Verem
Savoi VeremDainik Gomantak

Savoi Verem :

सावईवेरे, समाजात मोजक्याच संस्था आहेत, ज्या गरीब व गरजूंना आर्थिक मदतीचा हात देतात. या मोजक्या संस्थांमध्ये फोंडा तालुक्यातील कुंडई येथील सिध्दा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचा समावेश आहे.

या क्लबने कुंडई गावातील एका गरीब व गरजू महिलेला सामाजिक जाणिवेतून निरपेक्ष भावनेने त्यांच्या घरासाठी आर्थिक मदत दिली आहे. याबद्दल क्लबचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिद्धा क्लबने गेल्या आठवड्यात क्लबतर्फे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या आयोजनातून प्राप्त फायद्याची ३० टक्के रक्कम या गावातील गरजू श्रीमती नम्रता नाईक यांना घराच्या डागडुजीसाठी सुपूर्द केली. याद्वारे इतर संस्थांसाठी एकप्रकारचा आदर्श निर्माण केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष ॲड. विरेश रिवणकर, सचिव सर्वेश नाईक, सरपंच सर्वेश जल्मी, पंच रुपेश कुंडईकर तसेच क्लबचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Savoi Verem
Sanquelim Goa: साखळी रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

क्लबचे अध्यक्ष ॲड. विरेश रिवणकर म्हणाले, की स्पर्धांच्या आयोजनातून मिळालेल्या फायद्याची रक्कम मोठमोठ्या पार्ट्या करण्यातच विनाकारण वाया घालवली जाते. अशाप्रकारे जर का प्रत्येक क्लबने मिळालेली थोडीफार रक्कम गावातील एखाद्या गरजू व्यक्तीला दान केली तर पुण्याचे काम केल्यासारखे होईल. प्रसिद्धीसाठी आपण हे केलेले नसून इतर संस्थांनी सुद्धा आदर्श घेऊन नफ्यातील रक्कम दान करावी, एवढंच माझे वैयक्तिक मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com