Savoi Verem : ‘श्रमधाम’मधून या वर्षी १०० घरे उभारण्याचा संकल्प : सभापती रमेश तवडकर

Savoi Verem : सामूहिक तत्त्वावर श्रमदानातून घर उभारणी करण्यात येत आहे. निराधार लोकांना श्रमदानातून निवारा पुरवणे हीच श्रमधामाची संकल्पना आहे.
Savoi Verem
Savoi VeremDainik Gomantak
Published on
Updated on

Savoi Verem :

सावईवेरे श्रमधामातून मागील वर्षी वीस घरांची उभारणी केली असून यंदा १०० घरे बांधण्याचा संकल्प केला आहे.

सामूहिक तत्त्वावर श्रमदानातून घर उभारणी करण्यात येत आहे. निराधार लोकांना श्रमदानातून निवारा पुरवणे हीच श्रमधामाची संकल्पना आहे. प्रियोळ मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीत एक घराची बांधणी करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे,अशी माहिती सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी दिली.

सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून बलराम श्रमधाम योजना प्रियोळ मतदारसंघात सध्या जोरात चालू आहे.

या योजनेतून आज रविवारी वेरे - वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील वेलकास-सावईवेरे येथील लाभार्थी आशिष शिलकर यांच्या घर बांधणीचा शुभारंभ सभापती डॉ.रमेश तवडकर यांच्या शुभहस्ते पार पडला. आशिष शिलकर यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत होते.भारतमाता की जय, वंदे मातरम्, श्रमधामाचा विजय असो, जय जय श्रमधाम अशा जयघोषात श्रमधाम योजनेत येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून काम सुरू करण्यात आले आहे.

या सोहळ्यास सभापतींसह स्थानिक पंच सदस्य नवनाथ वेलकासकर , माजी पंच महेश शिलकर, वेरे - वाघुर्मे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रूपा नाईक, आनंद वाघुर्मेकर , विनय गावकर तसेच बरेच नागरिक व श्रमधाम स्वयंसेवक उपस्थित होते.

Savoi Verem
Goa Tenant Verification: 500 जण सापडले विनाकागदपत्राशिवाय; उत्तर गोव्यात पाच हजार जणांची पडताळणी

प्रियोळ मतदारसंघात ८ घरांची स्वप्नपूर्ती

श्रमधाम योजनेतून प्रियोळ मतदारसंघातील अत्यंत गरीब व गरजवंत अशा ८ व्यक्तींच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. या मोहिमेत अनेक समविचारी लोक जोडत आहेत. यावेळी बोलताना महेश शिलकर म्हणाले की सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली श्रमधाम योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

काणकोणहून श्रमधामचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रियोळात येऊन नि:स्वार्थीपणे काम करतात हे खरोखरच आजच्या युगात तरी आश्चर्याची बाब आहे. या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! असे सांगून शिलकर यांनी स्वयंसेवकांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com