Goa BJP Corruption: भाजपमधील 'बजबजपुरी' चव्हाट्यावर! सावियो रॉड्रिग्ज यांचा घरचा आहेर; तक्रार थेट मोदी-शहांच्या दरबारी!

Internal Rift in Goa BJP: गोव्यातील प्रशासनात भ्रष्टाचार वाढला आहे आणि त्यात भाजप पक्षातील काही जणांचा हात आहे.
BJP Leader Savio Rodrigues
BJP Leader Savio RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील प्रशासनात भ्रष्टाचार वाढला आहे आणि त्यात भाजप पक्षातील काही जणांचा हात आहे. ही खेदाची गोष्ट असून यासंबंधीची माहिती मी माझ्या जवळच्या सूत्रांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. मी यापुढेही भाजपातील भ्रष्टाचार उघडा पाडत राहणार आहे. पक्षाने माझ्यावर कुठलीही कारवाई केली तरी त्याची मला पर्वा नाही, असे सावियो रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी आज आणखी एक ट्विट करताना, गोव्यातील (Goa) भाजपमधील बजबजपुरी थांबवायची असेल, तर संघटनमंत्री सतीश धोंड यांना परत गोव्यात आणा अशी केंद्रीय भाजप नेत्यांकडे मागणी केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

BJP Leader Savio Rodrigues
Goa Politics: काँग्रेसचा 2027 साठी मास्टरस्ट्रोक! 'आरजी'चा पत्ता कट, गोवा फॉरवर्डशी जमवणार जवळीक; ठाकरे, निंबाळकरांशी लवकरच चर्चा

याबद्दल बोलताना रॉड्रिग्ज म्हणाले, मी भाजपच्या (BJP) विरोधात नाही, पण प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आहे आणि तो चालूच राहणार आहे. मी माझी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापुढे मांडली आहे. यापुढेही कुणी भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणे पुराव्यासह माझ्यापर्यंत आणली, तर त्यावर मी आवाज उठवणारच.

BJP Leader Savio Rodrigues
Goa Politics: 'आप'चा माजी मुख्यमंत्री चेहरा आता काँग्रेसच्या वाटेवर? अमित पालेकरांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा; लवकरच घोषणा!

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सावियो आमच्या कार्यकरणीचे सदस्य नाहीत असे जे वक्तव्य केले त्याबद्दल ते म्हणाले, जून २०२४ मध्ये जी राज्य कार्यकारिणी जाहीर झाली आहे त्यात सदस्य म्हणून माझे नाव आहे. या कार्यकारिणीत बदल झाला आहे की नाही हे मला माहीत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com