पाणी जपून वापरले तरच मिळेल फायदा: सावियो कुतिन्‍हो

दरमहा 16 युनिट मोफत पाणी देण्याचा निर्णय मंत्री नीलेश काब्राल यांनी घेतला
Savio Coutinho
Savio CoutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकेरी घरांप्रमाणेच बहुमजली इमारती आणि गृहनिर्माण सोसायट्यांना दरमहा 16 युनिट मोफत पाणी देण्याचा जो निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी घेतला आहे, त्याचे मडगाव शॅडो कौन्सिलने स्वागत केले आहे. तसेच निर्धारित क्षमतेत पाण्याचा वापर केला तरच ही सवलत मिळणार, अन्यथा नाही हेही स्पष्ट केले आहे.

मडगावात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शेडॉ कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी उदाहरण देताना सांगितले, जर एका इमारतीत जर 20 फ्लॅट्स असतील तर त्या इमारतीमधील प्रत्‍येक फ्लॅटला 16 याप्रमाणे 320 युनिट पाणी मोफत मिळू शकेल. मात्र हा वापर जर 321 युनिट झाला तर संपूर्ण 321 युनिटचे पैसे आहे त्या दरात भरावे लागणार आहेत. पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ही योजना लागू केली आहे. त्यामुळे पाणी मोफत मिळाले आहे असे समजून हवे तसे ते वापरल्यास या योजनेचा फायदा मिळू शकणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. बहुमजली इमारतीच्या पाणीबिलांबाबत मोठ्या प्रमाणावर घोळ होतो हे शॅडो कौन्सिलने मंत्री काब्राल यांच्या निदर्शनास आणून दिले होत.

Savio Coutinho
समाजमंदिरातून सर्वांगीण विकासाला चालना: विश्‍वजित राणे

ग्राहकांसाठी हेल्‍पलाईन

प्रत्येक सोसायटीने बिल मिळाल्यावर आपण नेमके किती युनिट पाणी वापरले आहे आणि किती युनिटची आकारणी केली आहे ते तपासून घ्यावे. बिलावर जो मीटर रिडींगचा आकडा आहे तोच मीटरवर आहे का हे पाहून घ्यावे. जर त्यात काही तफावत आढळून आल्यास संबंधित पाणी खात्याकडे तक्रार करावी असे आवाहन कुतिन्‍हो यांनी केले. अशा ग्राहकांना काही मदत हवी असल्यास त्यांनी 9423884016 या व्हाट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com