Mahadayi Water Dispute : म्हादईचा लढा आणखी तीव्र करणार : हृदयनाथ शिरोडकर

स्वातंत्र्यदिनापासून ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’तर्फे जलयात्रा
save mhadei save goa
save mhadei save goaDainik Gomantak

म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्यदिनापासून राज्यभर ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’तर्फे जलयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती चळवळीचे हृदयनाथ शिरोडकर यांनी दिली. यावेळी प्रा. प्रजल साखरदांडे, महेश म्हांबरे, सलमान खान हे उपस्थित होते.

हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, म्हादई वाचविण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी आम्ही हरप्रकारे सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु सरकार लक्ष देत नसल्याने आता येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजे १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या दरम्यान राज्यात म्हादई जल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे म्हादईचा लढा आम्ही आणखी तीव्र करणार असल्याचेही ते म्हणाले.

save mhadei save goa
Sirf Money : गोमंतकीय कलाकाराकडून ‘सिर्फ मनी’ चित्रपटाची निर्मिती; 4 ऑगस्टला देशभरात होणार प्रदर्शित

शिरोडकर पुढे म्हणाले, की २०१८ या दरम्यानच म्हादईच्या रक्षणासाठी गोवा सरकारने गोव्याच्या बाजूने आव्हान याचिका न्यायालयात सादर करणे आवश्यक होते, परंतु या प्रकरणात सरकारने चालवलेला चालढकलपणा आता उघड्यावर आल्याने म्हादईच्या रक्षणाबाबत हे सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे सिद्ध झाले आहे.

दुसरे म्हणजे, कर्नाटकला दिलेली डीपीआर मंजुरी ही पूर्णपणे रद्द करण्याची मागणी अजूनही न करता ही आव्हान याचिका दाखल केल्याने सरकारचे खरे रूप उघडे पडले आहे.

सरकारने सत्य सांगावे

प्रा. साखरदांडे म्हणाले, म्हादई ही आमची माता आणि जीवनदायिनी आहे. म्हादईचा प्रश्न हा केवळ राजकीय नसून तो गोमंतकीयांच्या काळजाचा आहे. तरीही सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

save mhadei save goa
Cortalim Market : कुठ्ठाळी बाजार संकुलात सुसज्ज कृषी विभाग

गोव्याने १० जुलै रोजी दाखल केलेली आव्हान याचिका ही निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. त्यामुळे सरकारने आतातरी जागल्याची भूमिकेतून म्हादईला वाचविण्यासाठी समस्त गोमंतकीयांना सत्य काय ते जाहीरपणे सांगावे.

सरकारचा भोंगळ कारभार

विद्यमान भाजप सरकार हे दिशाभूल करणारे सरकार आहे. गोव्याची माता असलेली म्हादई आज धोक्याची घंटा मोजत असतानाही सरकारला याचे काहीच पडलेले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका हे होय.

कारण ही आव्हान याचिका २०१८ मध्येच दाखल करण्याची आवश्यकता असताना इतक्या वर्षांनी ती आता दाखल केल्याने भाजप सरकारचा म्हादईबाबत चाललेला भोंगळ कारभार दृष्टीस येतो, अशी टीका सेव्ह म्हादई सेव्ह गोवाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com