मांद्रे (Mandrem) येथे मधलामाज वरून आश्र्वे (Ashwem) येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग (Garbage problem) जमा झाल्याने, काल रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या (Revolutionary Goa) मांद्रे गटाने सोशल मीडियावर आवाज उठवला. येथे खलप विद्यालयाच्या (Near Khalap School) बाजूलाच हे कचरा क्षेत्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. सूचनात्मक फलक लावून देखील जर का तिथे कचऱ्याचे साम्राज्य पसरत असेल तर पंचायत दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
"मांद्रे सारख्या सुंदर गावात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायचे सोडून, मोक्याच्या रस्त्यावर असा कचरा आढळून आला तर पर्यटक कशाला येतील? नितळ गोंय सारखे स्वप्न दाखवून गावातल्या साध्या कचऱ्याचे व्यवस्थापन या सरकारला जमत नाही. तरी पंचायतीने ही जागा साफ करून इथे एक नवीन कचरा क्षेत्र होण्यापासून वाचवावे", अशी विनंती सुनयना गावडे यांनी केली. हा रस्ता मांद्रे दर्यावरून मोरजी दर्यावर जाण्यासाठी मुख्य रस्ता असून, असे गलिच्छ रस्ते दाखवून पर्यटकांना नाराज करू नये, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.