Save Mahadayi Rally : आता सत्ताधाऱ्यांनी तत्काळ पायउतार व्हावे! म्हादईप्रेमींची मागणी

म्हापसा शहरात मेणबत्ती, मशाल रॅली
Save Mahadayi Rally
Save Mahadayi RallyDainik Gomantak

Save Mahadayi Rally : म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी असून या आईचे रक्षण करण्यासाठी गोमंतकीयांना आता रस्त्यावर उतरावेच लागेल. म्हादई नदी एकदा हातातून गेल्यास ती गोव्याला पुन्हा कधीच मिळणार नाही.

ही बाब प्रत्येकाने ध्यानात ठेवावी, असे शिवसेनेचे गोवा प्रमुख जितेश कामत यांनी सांगितले. राज्यातील सत्ताधाऱ्यांसह खासदारांसह मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी या म्हादईप्रेमींनी यावेळी केली.

Save Mahadayi Rally
Arambol Car Fire: हरमल-मांद्रे येथे चारचाकीला भीषण आग

म्हादई नदी कर्नाटकाने वळविल्यास गोमंतकीयांसह राज्यातील जैवविविधतेवर याचे विपरीत परिणाम भविष्यात पाहायला मिळतील. हे नुकसान भरून येणारे नाही. त्यामुळे गोमंतकीयांनी सेव्ह म्हादईच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन जितेश कामत यांनी केले.

म्हादई नदीच्या संरक्षणार्थ रविवारी (ता.१२) सायंकाळी उशिरा म्हापसा शहरात म्हादईप्रेमींनी सेव्ह म्हादई या बॅनरखाली मेणबत्ती व मशाल रॅली काढली.

या म्हादई सैनिकांकडून गांधी चौकात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती पेटविल्या, त्यानंतर तेथून हुतात्मा चौकास वळसा घेऊन पुन्हा गांधी चौकात या फेरीचे रुपांतर सभेत केले. यावेळी म्हादईप्रेमीं मोठ्या संख्येने या मेणबत्ती रॅलीत सहभागी झाले होते.

जितेश कामत पुढे म्हणाले, म्हादई नदीचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ठ असताना गृहमंत्री अमित शहा हे म्हादईसंदर्भात वक्तव्य करतात. गोवा सरकारच्या संगनमताने म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला वळविण्यास आम्ही डीपीआर मंजूर केल्याचे ते बोलतात. मुळात गृहमंत्र्यांच्या या विधानाविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची गरज आहे.

समाज कार्यकर्ते राहुल म्हांबरे म्हणाले, भाजपा सत्ताधाऱ्यांनी या मेणबत्ती, ज्योतीची इशारा समजून घ्यावा. कारण या अग्नीचा भडका होऊन सत्ताधारी यात भस्मसात होण्यास वेळ लागणार नाही. आता भाषणे करण्याची वेळ गेली असून कृतीची आवश्यकता आहे. केंद्राने कर्नाटकला जो डीपीआर मंजूर केला आहे, तो लवकरात लवकर मागे घ्यावा, यासाठी गोवा सरकारने केंद्रावर दबाव आणावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

यावेळी काँग्रेसचे संजय बर्डे, समाज कार्यकर्ते राजन घाटे, मार्शल परेरा, राहुल म्हांबरे, ऐश्वर्या साळगांवकर, जायगल लोबो, दिपेश नाईक, जॉन लोबो व इतर म्हादई प्रेमी उपस्थित होते.

कर्नाटकने म्हादई नदी वळविण्यासाठी पर्यावरण, वन्यजीव व जैवविविधता या कायद्यांचे त्यांनी थेट उल्लंघन केले आहे. आणि हीच बाजू गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडली पाहिजे. मात्र सरकार हे मुद्दे न्यायालयात अद्याप पटवून सांगू शकलेले नाही.

त्यामुळे आता गोमंतकीयांनी म्हादईच्या जनआंदोलनातून केंद्राच्या तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे, असे मत अ‍ॅड. यतिन नाईक यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com