Heritage of Goa: गोव्याचा वारसा, निसर्ग जतन करा

पर्यटनपूरक उद्योजकांचे मत: सरकारने बेकायदेशीर व्यवहार थांबविण्याची गरज
Heritage of Goa | National Tourism Day
Heritage of Goa | National Tourism DayDainik Gomantak

(प्रसाद सावंत)

National Tourism Day : देशातीलच नव्हे तर जगातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून गोव्याची ओळखून असून दर वर्षी लाखोच्या संख्येत पर्यटक येथे येतात. पर्यटन उद्योगात इतर पर्यटन स्थळांसोबत स्पर्धा करायची असेल, तर आपण वारसा आणि निसर्गाचे जतन करून पुढील वाटचाल करण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी राज्यातील समुद्र, नद्या आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवले पाहिजेत, असे मत पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी व्यक्त केले आहे.

Heritage of Goa | National Tourism Day
Currency Collector: गोव्यातील 'या' व्यक्तीकडे आहेत 150 देशांमधील चलन, एक हजार किलो दुर्मिळ नाणी..

निसर्गाचे वगरदान आम्हाला लाभल्याने राज्यात पर्यटन उद्योगाला वाव मिळाला आहे. यासाठी निसर्गाचे संवर्धन करून येथील पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्याची गरज आहे. गोवा हे कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याचा ओळख कायम ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पर्यटन उद्योगातील बेकायदेशीर व्यवहार थांबवण्यासाठी पर्यटन खात्याने कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. परंतु गोमंतकीयांनी देखील समुद्रकिनारे, समुद्र, नदी, धबधबे यांचे जतन करणे आवश्‍यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी जाऊन कचरा करण्याचा प्रकार हा टाळला पाहिजे. यासाठी जनजागृती केली जात आहे, असे घटकांचे म्हणणे आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्या प्रचंड वाढणार आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने पर्यटकांची गैरसोय झाल्यास राज्याच्या प्रतिमेवर याचा परिणाम होणार आहे, अशी भीती घटकांकडून व्यक्त करण्यात आली.

Heritage of Goa | National Tourism Day
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ, जाणून घ्या आजचे दर

गोव्यातील ग्रामीण भागाचे भव्य सौंदर्य, संस्कृती, इतिहास अनुभव घेण्यासाठी आम्ही पर्यटकांना आमंत्रित करत आहोत. आमच्या शांततापूर्ण आणि अद्वितीय समुदायांना राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त आमच्यात सामील होण्यासाठी आम्ही पर्यटकांचे स्वागत करतो. गोव्यातील कला आणि संस्कृती ही असून याचा येथे आल्यानंचर याचा आनंद आणि अनुभव घेता येईल.

- निखिल देसाई, संचालक, पर्यटन खाते

Heritage of Goa | National Tourism Day
Goa Government: गोवा सरकारकडून आणखी पाच खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव जाहीर

गोवा हा निसर्ग संपन्न प्रदेश असून आम्ही याचे संवर्धन करण्यासाठी धडपड केली पाहिजे. आपल्या परिसरात स्वच्छता राखून यात आम्ही योगदान करू शकतात. पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून हेलि जॉय राईड्स, बंजी जंपिंग आणि इतर काही उपक्रम सुरू केले गेले आहेत, जेणेकरून येथे उच्च दर्जाचे पर्यटक आकर्षित होणार आहेत.

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com