Sattari: झाडे कोसळली, विजेचे 3 खांब जमीनदोस्त! वादळी पावसामुळे सत्तरीत जनसेवा विस्कळीत

Power Supply Disrupted Goa: दोन दिवसांपासून सत्तरीत पावसाने जोर धरला असून रविवारी सायंकाळी मोठी पडझड झाली. वादळी वाऱ्याचा वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.
Power supply disrupted goa
Power supply disrupted sattari Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: दोन दिवसांपासून सत्तरीत पावसाने जोर धरला असून रविवारी सायंकाळी मोठी पडझड झाली. वादळी वाऱ्याचा वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. रात्री रेडीघाट येथे रस्त्यावर जंगली झाड पडून वाहतूक कोंडी झाली.

तसेच ठाणे सत्तरी येथील मंडळगिरो कोळगिरी मंदिराजवळ असलेले जुने व भले मोठे काजऱ्याचे झाड उन्मळून पडले आणि त्यात वीजवाहिनी जमीनदोस्त झाली. तसेच तीन विजेचे खांब मोडले.

त्यामुळे ठाणे व इतर परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. यावेळी अग्निशमन दलातर्फे मदतकार्य करत रस्त्यावर व वीजवाहिनीवर असलेला अडथळा दूर केला. या दुर्घटनेत सुमारे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले.

Power supply disrupted goa
Heavy Rain In Goa: गोव्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पडझड; गोवा, कोकणात आकस्मिक पूरजन्य स्थितीची शक्यता

कोपार्डे-सत्तरीतील प्रतिमा यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १० हजारांचे नुकसान झाले. तर २० हजारांची मालमत्ता अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविली. सोनाळ -सत्तरी येथील मारुती मंदिराजवळील रस्त्यावर झाड पडले. मलपण येथे सातेरी मंदिराजवळ रस्त्यावर व वीजवाहिनीवर आंब्याचे झाड पडून वीजवाहिनीचे नुकसान झाले. 

Power supply disrupted goa
Goa Monsoon: गोवेकरांनो काळजी घ्या! 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वादळी वाऱ्याचा इशारा

दाबोस  पुलाजवळही रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. वाळपई कदंब बसस्थानकाजवळ कांता गावकर यांच्या घराच्या शेडवर आंब्याचे झाडून नुकसान झाले.  तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने, कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com