Sattari: सत्तरीत प्रशासनाची मोठी कारवाई! तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर धाड; धोकादायक पदार्थ जप्त

Sattari Illegal Tobacco: सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा, ठाणे, केरी या भागांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानांवर सत्तरी मामलेदार यंत्रणेतर्फे धडक कारवाई करण्यात आली.
Sattari illegal tobacco sale
Sattari illegal tobacco saleDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा, ठाणे, केरी या भागांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानांवर सत्तरी मामलेदार यंत्रणेतर्फे धडक कारवाई करण्यात आली. अचानकपणे घातलेल्या या छाप्यांत अनेक ठिकाणांहून तंबाखूजन्य वस्तू जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सत्तरी तालुक्याचे मामलेदार धीरेंद्र बाणवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत संयुक्त मामलेदार विष्णू राणे, वाळपई सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राचे सॅनेटरी इन्स्पेक्टर गजानन पार्सेकर यांच्यासह इतर अधिकारी सहभागी झाले होते.

मामलेदार बाणवलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सरकारने संपूर्ण बंदी घातलेली असूनही काही दुकानांमधून ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने कारवाई आवश्यक ठरली.

Sattari illegal tobacco sale
FDA Raid: अस्वच्छ जागी बनायचे दही, जायचे नामांकित हॉटेल-दुकानात; ‘एफडीए’च्या कारवाईत म्हापसा येथील युनिट बंद

कारवाई दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. ज्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यांना पुन्हा असे प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Sattari illegal tobacco sale
Sattari Raid: खाण खात्याची मोठी कारवाई! सत्तरीत 3 चिरेखाणींवर छापा; 35 लाखांची मशिनरी जप्त

मामलेदार बाणावलीकर म्हणाले, “सरकारची बंदी असूनही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याचा भंग असून नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com