Sattari News : नाणूस-सत्तरी येथे १०० धोंडांनी पार केले अग्निदिव्य

Sattari News : शेकडो वर्षांची परंपरा : सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानची होमकुंड जत्रा उत्‍साहात
Sattari
SattariDainik Gomantak

Sattari News :

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस येथील सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानचा सुप्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव शनिवार दि. १३ व रविवार दि. १४ एप्रिल असा दोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या जत्रोत्सवात नाणूस भागातील १०० धोंडगणांनी अग्निदिव्य पार केले.

होमकुंडमुळे जत्रेला वेगळे स्वरुप प्राप्त होत असते. शिरगाव येथील लईराई देवीच्‍या उत्सवापूर्वी एक महिना आधी होणारा हा उत्सव म्हणजे एक सुरूवात असते. नाणूस बेतकीकरवाडा येथे होणारा हा उत्सव शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला आहे.

शनिवार रात्री ९ वाजता देवीची कळस मिरवणूक सातेरी देवस्थानच्या प्रांगणातून सुरू झाली व नंतर महादेव देवस्थानकडे प्रयाण केले. रात्री ‘आता माझी सटकली’ हा नाट्यप्रयोग झाला.

Sattari
Goa Flights: फक्त 1991 रुपयांत करा गोवा ते जळगाव विमान प्रवास ; Fly91 च्या नवीन उड्डाणांची घोषणा

आज रविवारी पहाटे ३.३० वा. व्रतस्थ शंभर धोंडगणांनी अग्निदिव्य पार केले. भाविकांना कौल देण्यात आला. देवीचे कळस गावातील घराघरांत फिरविण्यात आले. हे अग्निदिव्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.

नाणूस येथील सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानच्‍या होमकुंडामुळे जत्रेला वेगळे स्वरुप प्राप्त होत असते. शिरगाव येथील लईराई देवीच्‍या उत्सवापूर्वी एक महिना आधी होणारा हा उत्सव म्हणजे एक सुरूवात असते. या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे.

- राजेश गावकर, भाविक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com