Valpoi News : सत्तरीत विजेचा लपंडाव ; शुक्रवारी रात्रीपासून नागरिक त्रस्त

काल शुक्रवारी रात्री नगरगाव पंचायत भागातील विविध गावात वीजपुरवठा खंडित झाला होता.
Sattari Electricity
Sattari Electricity Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : वाळपई, : सत्तरी तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोर धरलेला आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. काल शुक्रवारी रात्री नगरगाव पंचायत भागातील विविध गावात वीजपुरवठा खंडित झाला होता.

त्यानंतर विजेची ये - जा सुरू होती. शनिवारी दिवसभर धावे येथेही वीज गूल झाली होती. सायंकाळी कमी दाबाचा वीजपुरवठा होता, परंतु त्यानंतर पुन्हा वीज खंडित झाली.

शुक्रवारपासून सुरू झालेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून हे प्रकार सातत्याने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वीज खात्याची यंत्रणा शनिवारी दुरुस्तीचे काम करीत होती, पण नगरगाव पंचायत भागात शनिवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही.

काल रात्री नऊनंतर पुन्हा वीज गूल झाली होती. त्याचा परिणाम आज पाणी पुरवठ्यावर झाला. गावात वीज नसल्याने सरकारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यातच गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे वेळूस, म्हादई नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. सत्तरी तालुक्यात विजेची समस्या गंभीरच होत चालली आहे. केवळ पावसामुळे वारंवार वीज गूल होण्याचे कारण तरी काय याबाबत लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Sattari Electricity
नागपूर ते गोवा! IRCTC चे 3 रात्र आणि 4 दिवसांचे टूर पॅकेज; एका फोन कॉलवर करा बुकींग

प्रश्न जटिल

सत्तरी तालुक्यात अनेक विकासकामे झाली आहेत, परंतु वीज समस्येवर अजूनही योग्य तो तोडगा काढण्यास सरकारला गेल्या गोवा मुक्तीपासून शक्य झालेले नाही. पाणी, रस्ते, वीज या लोकांसाठी दररोजच्या मूलभूत गोष्टी आहेत.

त्या कायमच्या सोडविण्यासाठी कार्यवाही गरजेची आहे. पण वीज समस्या सत्तरीच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस जटिलच बनलेली आहे. विशेष करून बंच केबल आल्यापासून वीज समस्या अतिशय गंभीर बनत चालली आहे.

वीज समस्येला बिलांचा झटका

सरकारकडून अनेकवेळा वीज बिलांत वाढ केली जाते. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत असते, पण वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना हाती घेताना दिसत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com