

वाळपई: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासनाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. जनजीवन सुरक्षित राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीत १५ मे २०२६ पासून सत्तरी तालुक्यात २४ तास कार्यरत राहणारा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळ्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून नागरिकांना मदत पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धोकादायक झाडे आणि जुन्या इमारतींची संयुक्त पाहणी करून संभाव्य धोके टाळण्याचे निर्देश देण्यात आले. पूरस्थिती टाळण्यासाठी नाले, गटारे आणि ओढ्यांची स्वच्छता युद्धपातळीवर करण्यावर भर देण्यात आला आहे.
चोर्लाघाट परिसरातील भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर जेसीबी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.